बोगस शालार्थ आयडी घोटाळा: एक हजार शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार, आकडा वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 21:44 IST2026-03-14T21:41:20+5:302026-03-14T21:44:18+5:30
Shalarth ID Ghotala Maharashtra: राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढताना दिसत आहे.

बोगस शालार्थ आयडी घोटाळा: एक हजार शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार, आकडा वाढण्याची शक्यता
Shalarth ID Ghotala Latest News: बोगस शालार्थ आयडी काढून शिक्षकांची भरती करून घेतल्याप्रकरणी प्रथमच एसआयटीमार्फत शिक्षकांच्या नावाची यादी तयार करण्यात आली असून या यादीत जळगावमधील तब्बल १००४ शिक्षकांचा समावेश करण्याचा आला आहे. हा आकडा तिपटीने वाढण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. यामध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आणि उपसंचालक बी. बी. चव्हाण यांच्या शेऱ्याने या शिक्षकांची नियुक्ती झाली असून ती नियुक्ती सदोष असल्याचे स्पष्ठ म्हटले आहे.
राज्यभरात गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडीप्रकरणी सुरुवातीला नाशिकच्या तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर दान वर्षात झालेल्या तपासात जिल्हा परिषदेसह महानगरपालिकेच्या अनेक शिक्षण अधिकाऱ्यांसह संस्थाचालकही यात रडारवर आले.
फिर्यादी अधिकारी चव्हाणही अडचणीत
या प्रकरणातील बहुतांश संबंधितांवर कायदेशीर कारवाईही करण्यात आली. फिर्यादी असलेल्या भाऊसाहेब चव्हाण यांच्यावरही याप्रकरणी गुन्हा दाखल असून याप्रकरणात जळगाव जिल्ह्यातील सुरू असलेल्या तपासाअंती अधिकारी आणि शिक्षणसंस्थांसह तब्बल १००८ शिक्षकांच्या नावांची यादी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
जळगावमधील ३५ पेक्षा अधिक संस्थांचा समावेश असून यांची नियुक्ती करताना नितीन बच्छाव आणि बी. बी. चव्हाण यांचीच स्वाक्षरी असल्याचे नमूद आहे. काही प्रकरणांत संभाजीनगर शिक्षण उपसंचालकांकडून कागदपत्रांची तपासणी करण्याचा शेराही मारण्यात आलेला आहे.
तपासणी अहवालात विविध शैक्षणिक संस्थांमधील नियुक्त्ती आदेश, शालार्थ ड्राफ्ट, कागदपत्रे व संबंधित नोंदींची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत अनेक ठिकाणी नोंदी अपूर्ण असल्याचे, कागदपत्रांमध्ये तफावत असल्याचे, तसेच आदेशांची माहिती शासकीय नोंदींशी जुळत नाही.