शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची धन्यता...

By admin | Updated: May 3, 2015 00:16 IST

पुरोगामी महाराष्ट्राला अनेक हत्याकांडं व अत्याचारांचाही इतिहास आहे. यासाठी त्या त्या वेळेच्या सरकारने घोषणाबाजी करीत कडक कायदे व

अमर मोहिते - 

पुरोगामी महाराष्ट्राला अनेक हत्याकांडं व अत्याचारांचाही इतिहास आहे. यासाठी त्या त्या वेळेच्या सरकारने घोषणाबाजी करीत कडक कायदे व नियमांची खैरात केली. प्रत्यक्षात सरकारच्या कडक कायद्यांचे भय काही काळच टिकू शकले. वारंवार सरकार कायदे टिकवण्यात अपयशी ठरते. तरीही कडक कायद्यांची ठोसपणे व कायमस्वरूपी अंमलबजावणी करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा अद्याप तयार झालेली नाही.सध्या महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी हा चर्चेचा केंद्रबिंदू आहे. गेल्या दोन महिन्यांत पोलिसांनी तर कारवाईचा धडका असा सुरू केला आहे, की जणू याचे व्यापारी गंभीर गुन्ह्यातील आरोपीच आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा कायदा लागू झाल्यानंतर याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनीही फडणवीस सरकारला खूश केले व स्वत:ची पाठही थोपटून घेतली. न्यायालयानेही या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे फर्मान जारी केले. त्यामुळे सरकारची कॉलर अधिकच टाइट झाली. पोलिसांना तर याने कमालीचे बळ मिळाले. पण हे सर्व किती काळ टिकणार, याविषयी ठोस असे उत्तर कोणीच दिलेले नाही. या बंदीची सुरुवात करून फडणवीस सरकारने एका विशिष्ट वर्गाला खूश केले जात असल्याचा आरोप सर्व स्तरांतून झाला. विशिष्ट रंगाच्या काही सामाजिक संघटनांनीही या बंदीचे स्वागत केले. एवढेच काय तर गायीचे महत्त्व महाभारतात कसे विषद करण्यात आले आहे, हेही न्यायालयाचा पटवून देण्याचा प्रयत्न काही सामाजिक संघटनांनी केला. हा हट्टाहास नेमका कशासाठी, की केवळ स्वत:ला प्रसिद्धीझोतात आणण्यासाठी या सामाजिक संघटना प्रयत्न करीत आहेत, या प्रश्नाचे उत्तर त्या संघटनाच देऊ शकतात. कारण एखादी घटना किंवा जनहितार्थ निर्णय झाले, की सामाजिक संघटना तत्काळ आपली भूमिका जाहिर करतात़ तसे बॅनरही लावायला विसरत नाहीत. पण पुढे जाऊन अशा सामाजिक संघटनांना आपण भूतकाळात काय केले होते याची आठवणही होत नाही. निव्वळ प्रसिद्धी या एकाच हेतूने अशा संघटना एखाद्या प्रश्नावर मतप्रदर्शन करतात. त्यामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी दीर्घकाळ टिकणे ही बाब अशक्यच म्हणावी लागेल. तसेच या देशातील कर्तव्यदक्ष नागरिकही अन्याय व अत्याचार झाला की हातात मेणबत्ती घेऊन मोर्चे काढतो. पण कायदे व नियमांचे पालन करताना किंवा त्यांची कायमस्वरूपी अंमलबजावणी होण्याची कोणीही धडपड करताना दिसत नाहीत. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात जेथे दलित व महिला अत्याचार अजून कमी झालेले नाहीत तेथे गोवंश हत्याबंदी कशी टिकेल, हे येणारा काळच सांगेल.