शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

काळी-पिवळी टॅक्सी झाली ‘स्मार्ट’

By admin | Updated: June 30, 2017 01:52 IST

काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांचे ‘आमची ड्राईव्ह’ हे अ‍ॅप अखेर गुरुवारी दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झाले आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांचे ‘आमची ड्राईव्ह’ हे अ‍ॅप अखेर गुरुवारी दीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झाले आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे परिवहन विभागाचे प्रतिनिधी म्हणून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांच्या हस्ते अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. या अ‍ॅपमुळे ओला-उबरच्या धर्तीवर काळी-पिवळी टॅक्सीही एका क्लिकवर बुक करता येणार आहे.‘आमची ड्राईव्ह’ अ‍ॅपमुळे तब्बल शतकाहून अधिक काळ मुंबईकरांना सेवा पुरवणारी काळी-पिवळी टॅक्सी आता स्मार्ट टॅक्सी म्हणून ओळखली जाणार आहे. या कार्यक्रमावेळी टॅक्सी युनियनचे अध्यक्ष एल.के. क्वाड्रोस आणि टॅक्सी युनियनचे नेते प्रेमसिंग उपस्थित होते. दरम्यान, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या अनुपस्थितीत आणि ससाणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.ओला-उबरच्या स्पर्धेत अ‍ॅप-बेस टॅक्सी सेवेत काळी-पिवळी टॅक्सी मागे पडत होती. परिणामी काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांनी अ‍ॅप-बेस सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून या अ‍ॅपवर काम सुरू होते. अखेर हे अ‍ॅप प्रत्यक्षात उतरले असून अ‍ॅपमध्ये प्रवासी भाडे रोख स्वरूपात आणि ई-वॉलेटच्या स्वरूपात देण्याची सोय आहे. बंगळुरूस्थित खासगी कंपनीने हे अ‍ॅप तयार केले आहे.देशात इमानदार टॅक्सीचालक म्हणजे मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सी अशी ओळख आहे. मात्र काही ५ ते १० टक्के टॅक्सीचालकांमुळे काळी-पिवळी सेवा बदनाम होत असल्याची खंत टॅक्सी युनियनचे अध्यक्ष क्वॉड्रोस यांनी व्यक्त केली. या अ‍ॅपमुळे प्रवाशांना कुठे जायचे आहे? हे सांगणे बंधनकारक नाही. टॅक्सीत बसल्यानंतर चालकाला कुठे जायचे आहे, ते ठिकाण सांगायचे आहे. त्यामुळे टॅक्सी चालकांचे भाडे नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अ‍ॅपमध्ये भाडे दरपत्रक (रेटकार्ड) असल्याने वाढीव भाड्याचा प्रश्नच येत नाही. मात्र प्रवाशांकडून ५ रुपये सेवा शुल्क आकारण्यात येणार असल्याचे क्वाड्रोस यांनी सांगितले.अ‍ॅप कसे वापराल?-अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर वातानुकूलित किंवा विनावातानुकूलित अशी टॅक्सी निवडावी.नोंदणी केलेल्या टॅक्सीमध्ये ‘आमची ड्राइव्ह’ असे स्टीकर चिकटवण्यात येईल.आतापर्यंत २ हजारांहून अधिक टॅक्सींची नोंदणी अ‍ॅपमध्ये करण्यात आली आहे.साध्या टॅक्सीसाठी पहिल्या दीड-किलोमीटरसाठी २२ रुपये शुल्क आकारण्यात येईल.दरपत्रकाप्रमाणे प्रवाशांनी भाडे द्यावे.इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर रोख रक्कम किंवा ई-वॉलेटच्या मदतीने भाडे देता येईल.