शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे सोनबा मुसळे मैदानाबाहेर

By admin | Updated: October 8, 2014 00:47 IST

सावनेर विधानसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र रद्द झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेणारे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सोनबा गुलाब मुसळे यांना दिलासा मिळाला नाही.

हायकोर्टाने याचिका फेटाळली : निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप नाहीनागपूर : सावनेर विधानसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र रद्द झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेणारे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सोनबा गुलाब मुसळे यांना दिलासा मिळाला नाही. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व पुखराज बोरा यांनी आज, मंगळवारी भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल ३२९ (बी) व सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देऊन मुसळे यांची रिट याचिका फेटाळून लावली. रिट याचिकेद्वारे निवडणुकीला आव्हान देऊ शकत नसल्याचे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. मुसळे यांनी २७ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र सादर केले होते. त्यासोबत २६ सप्टेंबर रोजी नोटरी केलेले शपथपत्र जोडले होते. नियमानुसार नामनिर्देशनपत्र व शपथपत्र कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले. यानंतर माळेगाव येथील मनीष मोहोड यांनी मुसळे हे शासकीय कंत्राटदार असल्यामुळे लोकप्रतिनिधी कायदा-१९५१ मधील कलम ९-अ अनुसार विधानसभेची निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याची तक्रार नोंदविली. त्यांनी पुराव्यादाखल मे. मुसळे कन्स्ट्रक्शनने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळविलेल्या १२ कामांची यादी व विविध याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या प्रती सादर केल्या. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुसळे यांना लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ९-अ मधील तरतुदी लागू होत असल्याचा निष्कर्ष नोंदवून नामनिर्देशनपत्र नामंजूर केले. हा वादग्रस्त आदेश रद्द करण्यात यावा व निवडणूक लढविण्याची परवानगी देण्यात यावी अशी मुसळे यांची विनंती होती. मुसळे यांच्यातर्फे वरिष्ठ वकील एम.जी. भांगडे व अ‍ॅड. अनिल किलोर, मोहोड यांच्यातर्फे वरिष्ठ वकील अरविंद गोरडे व अ‍ॅड. एस.एस. घाटे, तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यातर्फे सरकारी वकील भारती डांगरे व सहायक सरकारी वकील एम. के. पठाण यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)प्रतिवादींचे प्राथमिक आक्षेप स्वीकारलेनिवडणूक निर्णय अधिकारी व तक्रारकर्त्यातर्फे त्यांच्या वकिलांनी रिट याचिकेवर घेतलेले प्राथमिक आक्षेप न्यायालयाने स्वीकारले. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल ३२९ (बी) अनुसार रिट याचिकेद्वारे निवडणुकीला आव्हान देता येणार नाही. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इव्हीएम यंत्रांची तपासणी होत आहे. याचिकाकर्त्यासाठी निवडणूक याचिका दाखल करण्याचा पर्याय मोकळा आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचे विविध निर्णय सादर करून रिट याचिका खारीज करण्याची विनंती केली.याचिकेच्या समर्थनीयतेवर भरउच्च न्यायालयाने सुरुवातीला केवळ रिट याचिकेच्या समर्थनीयतेवर भर दिला. या प्रकरणात रिट याचिका स्वीकारली जाऊ शकते किंवा नाही एवढेच त्यांनी तपासले. तिन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने याचिका असमर्थनीय असल्याचा निष्कर्ष नोंदविला. गेल्या तारखेला न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रतिवादींनी आपापले उत्तर, तर याचिकाकर्त्याने मे. मुसळे कन्स्ट्रक्शनचे मूळ भागीदारीपत्र सादर केले. परंतु, याचिका टिकाऊ असल्याचेच सिद्ध न झाल्यामुळे न्यायालय प्रकरणाच्या गुणवत्तेत शिरले नाही. मुसळे यांच्याकडे दोन पर्यायहायकोर्टाने दिलासा नाकारल्यामुळे सोनबा मुसळे यांच्यापुढे आता दोन पर्याय उरले आहेत. पहिल्या पर्यायांतर्गत ते हायकोर्टाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. दुसऱ्या पर्यायांतर्गत त्यांना निवडणूक झाल्यानंतर हायकोर्टात निवडणूक याचिका दाखल करता येईल. त्यावेळी प्रकरणातील गुणवत्तेवर सुनावणी केल्या जाईल. मुसळे यांच्यावर अन्याय झाल्याचे सिद्ध झाल्यास सावनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द होऊ शकते. यानंतर नव्याने होणाऱ्या निवडणुकीत मुसळे यांना लढता येईल.