शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे तेच, शिवसेनेचे फ्रेश

By admin | Updated: September 26, 2014 01:22 IST

युती दुभंगल्यानंतर उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्याऐवजी थेट विद्यमान आमदारांना अर्ज भरण्यास भाजपकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार आमदार

फडणवीस, खोपडे, देशमुख, कुंभारे सज्जनागपूर: युती दुभंगल्यानंतर उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्याऐवजी थेट विद्यमान आमदारांना अर्ज भरण्यास भाजपकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार आमदार अर्ज दाखल करणार आहेत. उत्तर आणि दक्षिणच्या उमेदवारांचाही निर्णय शुक्रवारीच होणार आहे.भाजपच्या स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह शुक्रवारी पूर्व नागपूरसाठी पक्षाचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे, पश्चिम नागपूरसाठी विद्यमान आमदार सुधाकर देशमुख, मध्य नागपूरसाठी विकास कुंभारे एकत्रितपणे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कामठीमधून भाजपचे विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे अर्ज भरणार आहेत. यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचा निरोप भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. दरम्यान शहरातील उत्तर आणि दक्षिण नागपूरसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असून त्यात नावे निश्चित केली जाणार आहे. शिवसेनेने त्यांचे उमेदवार निश्चित केले असले तरी ते शनिवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)गडकरी, फडणवीस देणार राजकीय धक्केशिवसेनेसोबत असलेली युती तुटल्यानंतर नागपूर शहर आणि जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस पुढील दोन दिवसांत मोठे राजकीय धक्के देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही नेते मागील काही दिवसांपासून गडकरी आणि फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. परंतु युती तुटण्याची अधिकृत घोषणा न झाल्यामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत त्यांचे ‘तळ्यात- मळ्यात’ सुरू होते. संध्याकाळनंतर मात्र या नेत्यांचे संपर्क करणे सुरू झाले. मध्यरात्रीपासून गाठीभेटीदेखील सुरू झाल्या. शुक्रवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून किती मोठे भूकंप होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.