दुष्काळासाठी भाजपाची १६०० कोटींची पाकिटमारी - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: October 2, 2015 09:39 IST2015-10-02T09:39:16+5:302015-10-02T09:39:45+5:30

दुष्काळनिधीसाठी राज्यावर करभार लादून सरकारने पाकीटमारी केल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

BJP's Rs 1600 crore Paktammara for drought - Uddhav Thackeray | दुष्काळासाठी भाजपाची १६०० कोटींची पाकिटमारी - उद्धव ठाकरे

दुष्काळासाठी भाजपाची १६०० कोटींची पाकिटमारी - उद्धव ठाकरे

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २ -  दुष्काळनिधीसाठी राज्यावर करभार लादून सरकारने  पाकीटमारी केल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दुष्काळग्रस्त राज्याच्या नजरा आता मोदींकडू असून त्यांनी आर्थिक मदत जाहीर करुन राज्याचा भार हलका करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

दुष्काळनिधीसाठी राज्य सरकारने सिगारेट, विडी, दारु, पेट्रोल व डिझेलवरील कर वाढवला आहे. यावरुन शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. दुष्काळासाठी करवाढीचा निर्णय म्हजणे याच्या खिशात हात घालून थोडे त्याच्या खिशात घालायचे व त्यातलाच माल हपापा करुन राज्याच्या तिजोरीत टाकायचा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी करवाढीचा खरपूस समाचार घेतला.  पण करवाढ करुन शेतक-यांचे प्रश्न खरंच सुटतील का महत्त्वाचा प्रश्न असून मोदींनी बिहारप्रमाणेच  महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

Web Title: BJP's Rs 1600 crore Paktammara for drought - Uddhav Thackeray