शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची वाटचाल अध्यक्षीय राजवटीकडे

By admin | Updated: July 5, 2017 04:22 IST

‘सातत्याने नवीन अध्यादेश काढून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्ष थेट

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘सातत्याने नवीन अध्यादेश काढून अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयानंतर ग्रामपंचायतींचे सरपंचही थेट जनतेतून निवडण्याचा डाव खेळणाऱ्या भाजपाची वाटचाल अध्यक्षीय राजवटीकडे सुरू आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मंगळवारी साताऱ्यात आले होते.सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करताना पवार म्हणाले, ‘नगरपालिका व ग्रामपंचायतींमध्ये भाजपला बहुमत मिळत नाही, म्हणून अध्यक्ष व सरपंच निवडी थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिगटाने घेतलेल्या या निर्णयामुळे गावागावात वादाची ठिणगी पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमत एका बाजूला तर नगराध्यक्ष व अथवा सरपंच एका बाजूला, अशी स्थिती निर्माण होईल. सरपंचाने एखादा ठराव मांडला तर त्याला बहुमतातील विरोधकांकडून निश्चितपणे विरोध होईल. साहजिकच राजकीय वादावादीमुळे गावांचा विकास खुंटण्याची शक्यता आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात याबाबत सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत.’ परदेशातील काळा पैसा आणणार, १५ लाख रुपये लोकांच्या खात्यांत जमा करणार, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी, शेती उत्पादनाला आधारभूत किंमत, नोकऱ्या उपलब्ध करणार, उद्योग क्षेत्र वाढविणार अशा घोषणा मोदींनी निवडणुकीपूर्वी केल्या होत्या. मात्र, एकही घोषणा सत्यात उतरलेली नाही. धोतर-लुगडीही महाग़़़निवडणुकीत केलेल्या घोषणा मोदी सरकारने पूर्ण केल्या नाहीत़ जीएसटी लागू करून सर्वसामान्यांचे धोतर-लुगडीही सरकारने महाग केली, अशी टीकाही अजित पवार यांनी केली.