शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे ‘मोदी एके मोदी’च

By admin | Updated: September 26, 2014 01:21 IST

लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर भारतीय जनता पक्षाने तोच ‘फॉर्म्युला’ विधानसभेच्या प्रचारात वापरण्याचे ठरविले आहे. अगोदरपासूनच भाजपाकडून निवडणुकांमध्ये स्वतंत्र

राज्यातील एकाही नेत्याला ‘होर्डिंग’वर स्थान नाही : प्रचारात लोकसभेप्रमाणेच ‘फॉर्म्युला’योगेश पांडे - नागपूर लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर भारतीय जनता पक्षाने तोच ‘फॉर्म्युला’ विधानसभेच्या प्रचारात वापरण्याचे ठरविले आहे. अगोदरपासूनच भाजपाकडून निवडणुकांमध्ये स्वतंत्र प्रचाराचे संकेत देण्यात आले होते व राज्याप्रमाणेच उपराजधानीत ठिकठिकाणी पक्षाचे ‘होर्डिंग्ज’ लागलेले दिसून आले. सर्व ‘होर्डिंग्ज’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच ‘फोकस’ करण्यात आले असून राज्यातील एकाही भाजपा नेत्याला यात स्थान नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या वर्षी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुका व लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या संपूर्ण प्रचाराचे केंद्रबिंदू नरेंद्र मोदी हेच होते. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेनेची युती होणार की नाही यावर गेले काही आठवडे सातत्याने चर्चांना उधाण आले होते. परंतु युतीची प्रतीक्षा न करता भाजपाने प्रचाराला सुरुवात केली होती व उपराजधानीत ठिकठिकाणी नरेंद्र मोदी यांची मोठमोठी छायाचित्रे असलेली ‘होर्डिंग्ज’ लावण्यात आली. यात शिवसेनेचा कुठेही उल्लेख नसल्यान युतीबाबत शंका व्यक्त करण्यात येत होतीच. गुरुवारी शिवसेनेसोबतची २५ वर्षे जुनी युती तुटली अन् भाजपाच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला.दरम्यान, भाजपातर्फे लावण्यात आलेल्या ‘होर्डिंग्ज’वर स्थानिकच नव्हे तर राज्यातील मोठ्या नेत्यांनादेखील स्थान देण्यात आलेले नाही. अगदी मुख्यमंत्रिपदासाठी नाव समोर करण्यात येत असलेले वजनदार नेतेदेखील ‘आऊट आॅफ फोकस’च आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकांत प्रादेशिक नेत्यांना ‘प्रोजेक्ट’ करण्यापेक्षा नरेंद्र मोदी यांच्याच नावावर भाजपा मत मागणार हे स्पष्ट झाले आहे. ‘फॉर्म्युला’ चालणार का?लोकसभा निवडणुकांत प्रचाराच्या वेळी ‘मोदी’ यांची लाटच निर्माण झाली होती. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या परिस्थितीत बराच फरक असल्याचे मत राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. लोकसभेदरम्यान राष्ट्रीय मुद्यांवर जास्त भर देण्यात आला होता. परंतु विधानसभा निवडणुकांदरम्यान स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणे जास्त महत्त्वाचे ठरते. शिवाय जातीची समीकरणे व गटातटाचे राजकारण यालादेखील यात महत्त्व असते. अशा स्थितीत केवळ ‘मोदी एके मोदी’ हा प्रचाराचा ‘फॉर्म्युला’ कितपत चालणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.