शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

राज्यातील मंत्र्यांना बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र, जयंत पाटील यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 14:15 IST

पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. मात्र त्यांना गुन्ह्यात गोवण्याचे काम केले जात आहे. असेच इतर मंत्र्यांच्याबाबतही घडते आहे. जे खरे मनी लॉण्ड्रींग करीत आहेत, त्यांना सोडून दिले आहे आणि जे करीत नाहीत, त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवले जात आहे.

अहमदनगर - ओढून ताणून प्रकरणे तयार करायची आणि राज्यातील मंत्र्यांना बदनाम करायचे, असे भाजपचे षडयंत्र आहे. ईडीकडून होणाऱ्या कारवाईची माहिती भाजप नेत्यांनाच कशी समजते? ईडी आणि सीबीआयची कार्यालये म्हणजे, भाजपची कार्यालये झाली आहेत, अशी घणाघाती टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. मात्र त्यांना गुन्ह्यात गोवण्याचे काम केले जात आहे. असेच इतर मंत्र्यांच्याबाबतही घडते आहे. जे खरे मनी लॉण्ड्रींग करीत आहेत, त्यांना सोडून दिले आहे आणि जे करीत नाहीत, त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवले जात आहे. अशा प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, मात्र ते भाजपात गेले आहेत, त्यांचे काय झाले? राज्यात असे अनेक लोक आहेत, जे सध्या भाजपत आहेत. ज्यांना ईडीने नोटिसा दिलेल्या आहेत. त्यांच्या चौकशीचे काय झाले. पाहिजे तर आम्ही त्याची यादी देतो, असेही पाटील म्हणाले. भाजपमध्ये गेले की त्यांना ईडी,  सीबीआयकडून संरक्षण दिले जात आहे. एकाने दुसऱ्या शंभर कोटीची मागणी केली आहे, याबाबतच्या संभाषणाची क्लीप मिळाली म्हणून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईंडी कारवाईच्या कक्षेत घेतले. प्रत्यक्षात पैसे दिलेही नाहीत आणि घेतलेही नाहीत. 

ईडीकडून चौकशी होणार म्हटल्यानंतर पदावर राहणे योग्य नव्हते म्हणून त्यांनी स्वत:च राजीनामा दिला, असे पाटील यांनी स्पष्ट केले. अर्धे मंत्रीमंडळ दवाखान्यात दिसेल, असे किरिट सोमय्या म्हणाले आहेत. याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, सोमय्या यांना हे कसे माहिती? तेच ईडी, सीबीआय, आयकर खाते चालवतात का? ही कार्यालये म्हणजे भाजपची आहेत का? असा सवाल त्यांनी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिन्ही पक्ष एकत्र, परिस्थिती पाहून निर्णय - राज्यातील तिन्ही पक्ष एकत्रच काम करीत आहेत. प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांनी काम करावे, यासाठी स्वबळावर लढण्याबाबत घटक पक्षातील नेते बोलले असतील. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिन्ही  पक्ष  एकत्र  असून  स्वतंत्र लढण्याचा एखाद्याचा  आग्रहच असेल तर त्याला आम्ही काही करू शकणार नाही.  त्यासाठी निवडणुकीआधी  स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. 

महापालिका, नगरपालिकेतील प्रभागांबाबत काही कॉंग्रेस नेत्यांकडून दोन, तर काही नेत्यांकडून चार सदस्यांचा प्रभाग करावा, अशी मागणी होती. राष्ट्रवादीनेही दोन सदस्यांचा प्रभाग असावा, अशी भूमिका घेतली होती. मात्र महाविकास आघाडीने त्यावर तोडगा काढत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला असून तोच  अंतिम  राहणार आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रिफ नगर जिल्ह्याला वेळ देत नाहीत, अशा त्यांच्याबाबत तक्रारी असल्या तरी कामे  काही  थांबलेली  नाहीत.   

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय