शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

संघ, भाजपाला शिव्या घालणाऱ्यांचे पक्षप्रवेश होताहेत; भाजपामधील इनकमिंगवरुन शिवसेनेचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 1:48 PM

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपावर निशाणा

मुंबई: कधीकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपाला शिव्या घालणाऱ्यांचे सध्या पक्षप्रवेश होत आहेत, अशा शब्दांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. सध्या उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याचे दिवस आहेत. इतरांकडे निष्ठा राहिलेली नाही, पण शिवसेनेकडे अद्यापही निष्ठा आहे, असं म्हणत राऊत यांनी शिवसेनेतील इनकमिंगचं समर्थन केलं. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यावर भाष्य करताना राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा संदर्भ दिला. भाजपामध्ये होणारे प्रवेश केवळ स्वार्थापोटी होत असल्याचं पाटील म्हणतात. कोणी कुठे गेल्यावर शुद्ध होतो, यावर माझा विश्वास नाही. गरजेतून राजकारणात तडजोडी होतात, अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपामधील इनकमिंगवर अप्रत्यक्ष टीका केली. मात्र शिवसेना याला अपवाद असल्याचं ते म्हणाले. 'सचिन अहिर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. त्यांना आम्ही कोणतंही वचन दिलेलं नाही. कोणत्याही कमिटमेंटशिवाय ते शिवसेनेत आले आहेत,' असं राऊत यांनी म्हटलं. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्ष सोडावा, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. ज्यांना आज या पक्षांतराची चिंता वाटते, त्यांनी आधी काय केलं, असा सवाल राऊत यांनी विचारला. बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेली अनेक माणसं काँग्रेस, राष्ट्रवादीनं फोडली. त्यावेळी शिवसेनेला काय वाटलं असेल, याचा विचार फोडणाऱ्यांनी केला होता, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. शिवसेनेतील इनकमिंगचं समर्थन करताना त्यांनी सक्षम विरोधी पक्ष लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. विरोधी पक्ष न टिकल्यास सत्ताधारी मुजोर होईल आणि लोकशाहीचं डबकं होईल, असं राऊत म्हणाले.  

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत