शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावर एक हाती सत्तेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; ‘या’ नेत्याकडे जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:57 IST

Maharashtra Politics News: एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यावर एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics News: मुंबई, ठाणे, पुणे यासह राज्यभरातील अनेक महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्याशिवाय महापालिका निवडणुका होऊ शकणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील सुनावणी आता ६ मे रोजी होणार आहे. असे असले तरी राज्यातील सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. 

या महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, पुणे यासह काही ठिकाणी नेमके काय होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुंबईत सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे. मागील महापालिका निवडणुकीत अगदी थोड्या जागा भाजपाला कमी पडल्या होत्या. परंतु, आता मात्र भाजपा कंबर कसून तयारीला लागला आहे. तर शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरीनंतर होणारी ही पहिली महापालिकेची निवडणूक असणार असून, शिंदे गटाची महत्त्वाची साथ भाजपाला मिळणार आहे. उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी महायुती प्रयत्नशील असणार आहे. परंतु, ठाणे महापालिका भाजपासाठी महत्त्वाची मानली जात आहे. ठाण्यात एक हाती सत्ता मिळण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली असून, करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी एका बड्या नेत्यावर जबाबदारी देण्यात आल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात आहे.

रात्री शिंदेंचा पाहुणचार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यावर एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. हे काम वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर  आहे.  मात्र, नाईकांचा बालेकिल्ला नवी मुंबईत शिंदेसेना बिनधास्त आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेने गळाला लावलेले नाईक समर्थक माजी नगरसवेक अद्यापही शिंदेंच्या दावणीला आहेत. यात पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केल्यानंतर बाईट देण्यात हे लोक आघाडीवर होते. हे लोक दिवसा दादांचा प्रचार, रात्री शिंदेंचा पाहुणचार घेणारे असल्याची चर्चा नाईक  कार्यकर्त्यांत  आहे.

दरम्यान, शिंदेसेनेने ठाकरे गटाला खिंडार पाडण्याचे काम सुरूच ठेवले आहे. राज्यभरातून अनेक आजी-माजी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. एकीकडे तोंडावर आलेली महापालिका आणि दुसरीकडे पक्षातील गळती थांबता थांबत नसल्याची स्थिती या दोन्ही आघाड्यांवर उद्धव ठाकरेंना कसरत करावी लागत आहे. जायचे त्यांना जाऊ द्या, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरेंना मुंबई, ठाणे आणि अन्य ठिकाणी महापालिका चांगलीच जड जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काही झाले तरी मुंबई महापालिका राखायचीच असा चंग उद्धव ठाकरेंनी बांधला असून, त्यादृष्टीने ठाकरे गटाने तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका