भाजपाने राजकीय व्यभिचाराचा कळस गाठला : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:02 IST2019-08-28T12:00:03+5:302019-08-28T12:02:09+5:30

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज माळशिरस तालुक्यात करणार प्रवेश

BJP reaches the climax of political adultery: Jayant Patil | भाजपाने राजकीय व्यभिचाराचा कळस गाठला : जयंत पाटील

भाजपाने राजकीय व्यभिचाराचा कळस गाठला : जयंत पाटील

ठळक मुद्दे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज माळशिरस तालुक्यात- राष्ट्रवादीचे बडे नेते सोलापूर जिल्हा दौºयावर- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू

पंढरपूर : भाजपाने राज्यातील राजकीय व्यभिचाराचा कळस गाठला आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला.

काही नेते बँक व कारखान्याच्या कर्जाला घाबरून तर काहींना आमिषे दाखवली जात आहेत, त्यामुळे पक्षांतरचे प्रमाण वाढत आहे. सत्तेचा आश्रय हवा म्हणून ते लोक गेले व जात आहेत. राज्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद जास्त आहे, म्हणूनच राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र नागरिक लोकसभेत जे केले ते विधानसभेत करतील असं वाटत नाही, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. 

विधानसभेत व विधानपरिषदेत प्रभावी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आम्ही ताकद दाखवून दिली आहे. शिवसेनेमुळे भाजपला धोका नाही तर शिवसेनेच्या मुळावरच भाजप येणार आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला खा. डॉ. अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी उपस्थित होते.


 

Web Title: BJP reaches the climax of political adultery: Jayant Patil