Ram Kadam : “विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करा, सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 12:08 PM2022-10-29T12:08:23+5:302022-10-29T12:14:23+5:30

BJP Ram Kadam : भाजपा नेते राम कदम यांनी एअरबस आणि वेदांता फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणी केली आहे.

BJP Ram Kadam Slams mahavikas aghadi leader airbus project and vedanta | Ram Kadam : “विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करा, सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील”

Ram Kadam : “विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करा, सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील”

googlenewsNext

वेदांता- फॉक्सकॉनपाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाईल. या घोषणेमुळे महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भ विकासाच्या स्वप्नांना धक्का बसला आहे. यावरून सध्या राजकारण तापलं आहे. 

भाजपा नेते राम कदम (BJP Ram Kadam) यांनी एअरबस आणि वेदांता फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणी केली आहे. तसेच नार्को टेस्टने सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील असंही म्हटलं आहे. राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "एअरबस आणि वेदांता फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या प्रमुख सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा. वेदांता फॉक्सकॉनच्या टीमने तळेगावला जागा फायनल करून सुद्धा त्यांना इतर राज्यात का जावे लागले?"

"नार्को टेस्टने सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील”

"त्यांच्याकडून कोणी आणि किती टक्केवारी, कमिशन मागितले? कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मीटिंग झाली? मीटिंगला कोण कोण उपस्थित होते? वेदांताने जागा फायनल करून सुद्धा त्यांच्यासोबत MOU का केला नाही? कंपनीच्या प्रमुख लोकांना भेटण्यास टाळाटाळ का? आणि कोणाच्या सांगण्यावरून केली? नेमक हेच  कारण एअरबसच्या बाबतीत सुद्धा आहे का? नार्को टेस्टने सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील" असं राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"चोराच्या उलट्या बोंबा"

"सत्तेच्या काळात ज्यांनी छोट्या मोठ्या हॉटेलवाल्यापासून कॉन्ट्रॅक्टरपर्यंत आणि बदल्यामध्ये किती करोड रुपये घायचे. यांची लिस्टच बनवली होती. ज्यांनी वाझेपासून अधिकाऱ्यांना वसुली वसुली खेळात जुपले होते. पोलिसांना सुद्धा ज्यांनी सोडलं नाही. ते करोडो करोडोच्या प्रोजेक्टला सहज काही वसुली न करता सोडतील का?" असंही कदम म्हणाले. यासोबतच त्यांनी चोराच्या उलट्या बोंबा हा हॅशटॅग देखील वापरला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: BJP Ram Kadam Slams mahavikas aghadi leader airbus project and vedanta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.