शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 1:18 PM

भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देराधाकृष्ण विखे-पाटील यांची ठाकरे सरकारवर टीकापालकमंत्री पाहुण्यासारखे येतात - विखे-पाटीलनियोजन करण्यात राज्य सरकार अपयशी - विखे-पाटील

मुंबई: राज्यात गंभीर होत चाललेली कोरोनाची परिस्थिती आणि लसीचा तुटवडा यांवरून राजकारण तापत चालल्याची चिन्हे आहेत. कोरोना लसीच्या कमतरतेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोक्ष पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. मंत्र्यांना सध्या मुख्यमंत्र्यांनी एकच काम दिलंय. केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका, अशी टीका विखे-पाटील यांनी केली आहे. (radha krishna vikhe patil slams thackeray govt over corona situation in the state)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करताना दिसत आहे. राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा चिमटा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काढला आहे. 

Anil Deshmukh: CBI च्या तपासाला वेग; अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील NIA च्या कार्यालयात दाखल

नियोजन करण्यात राज्य सरकार अपयशी

केंद्रावर बोट दाखवण्यापेक्षा रेमडेसिवीर, ऑक्सिजन उपलब्ध करा. प्रत्येक मंत्र्याला आपापल्या मतदारसंघात २०० बेडचं कोविड रुग्णालय उभारायला सांगा. इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्याला व्हॅक्सिन मिळाले. पण त्याचे नियोजन राज्य सरकार करू शकले नाही. तो नियोजनशून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. हजारो रुग्ण रुग्णालयात आहेत. हजारो रुग्णांना बेड मिळत नाहीत, अशा शब्दांत विखे-पाटील यांनी टीका केली. 

इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात

नगर जिल्ह्यात ४ मंत्री आहेत. इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात ते एकही कोविड रुग्णालय सुरू करू शकलेले नाहीत, असा खोचक टोला हसन मुश्रीफ यांना लगावत सगळी मदार खासगी रुग्णालयांच्या भरवश्यावर सोडली आहे. जिल्ह्यातील सर्व मंत्री करतात काय, असा संतप्त सवाल विखे-पाटील यांनी केला आहे.

“सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या असून, राज्याला पुरेसे लसीचे डोस मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारकडून वारंवार केली जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून पुरेसे लसीचे डोस दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस