शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

सावनेरमध्ये भाजपला धक्का

By admin | Updated: October 1, 2014 00:54 IST

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी सावनेर मतदारसंघातून रिंगणात उतरविलेले उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविला. तर रामटेक विधानसभा

मुसळेंचा अर्ज बाद : रेड्डी रिंगणात कायमसावनेर/रामटेक : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी सावनेर मतदारसंघातून रिंगणात उतरविलेले उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द ठरविला. तर रामटेक विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या उमदेवारीवरही आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर दोन्ही पक्षाची बाजू आणि कागदोपत्री पुरावे तपासल्यानंतर रेड्डी यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही उमदेवार शासकीय कंत्राटदार असल्याचा आरोप करीत त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला होता.भाजपचे सावनेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सोनबा मुसळे हे मुसळे कन्स्ट्रक्शनचे भागीदार असून, त्याद्वारे शासकीय कामाचे कंत्राट घेतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ९ (अ) मधील तरतुदीनुसार विधानसभा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याबाबत मनीष मोहोड (रा. माळेगाव) यांनी करीत लेखी तक्रार आक्षेप घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत केलेल्या १२ कामांची यादीही त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमक्ष सादर केली. या आक्षेपाच्या अनुषंगाने सोनबा मुसळे यांना त्यांची बाजू मांडण्याची सोमवारी संधी देण्यात आली. त्यात मुसळे कन्स्ट्रक्शन कंपनी ही सोनबा मुसळे यांच्यासह त्यांची पत्नी कल्पना आणि मुलगा रोहित हे भागीदारीत चालवितात. या फर्ममधून भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे हे २६ सप्टेंबर रोजीच मुक्त झाले असल्याचे शपथपत्र अ‍ॅड. किल्लोर यांनी सादर केले. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विनोद हरकंडे यांनी निकाल राखून ठेवला. मंगळवारी त्यावर सुनावणी करताना शासकीय कंत्राटदार असल्याचे सांगून सोनबा मुसळे यांचा अर्ज अवैध ठरविला.