कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 04:02 PM2021-04-09T16:02:47+5:302021-04-09T16:05:07+5:30

भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

bjp narayan rane slams uddhav thackeray over corona situation in the state | कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

googlenewsNext
ठळक मुद्देनारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणाउद्धव ठाकरेंवर नारायण राणेंनी केली टीकाकोरोना परिस्थितीवरून सरकारवर हल्लाबोल

मुंबई: राज्यात गंभीर होत चाललेली कोरोनाची परिस्थिती आणि लसीचा (Corona Vaccination) तुटवडा यांवरून राजकारण तापत चालल्याची चिन्हे आहेत. कोरोना लसीच्या कमतरतेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोक्ष पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. कुटुंबं सांभाळू शकत नाही, ती व्यक्त कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार, असा सवाल राणे यांनी केला आहे. (narayan rane slams uddhav thackeray over corona situation in the state)

अनिल देशमुख, सचिन वाझे प्रकरणावरूनही नारायण राणे यांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली. राणे यांनी पत्रकारांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असताना कुटुंबातील सगळे जण रुग्णालयात कसे? म्हणजे कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती महाराष्ट्र व कोरोनाबाधित रूग्णांना कसे सांभाळणार? हे अपयश आहे. कोरोना हाताळायला हे सरकार कमी पडले आहे. केंद्राकडे का बोट दाखवता, अशी विचारणा नारायण राणे यांनी यावेळी केली.

“सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे”

राज्य सरकारला गांभीर्य नाही

महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. करोना संसर्ग वाढत असताना, त्यावर उपाययोजना करायला हा महाराष्ट्र कमी पडला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत रूग्णांची संख्या वाढत आहे, मृत्यूंची संख्या वाढत आहे. याचं गांभीर्य राज्य सरकारला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. राज्यात डॉक्टर्स नाही. जसे माझे कुटुंब माझी जबाबदारी, तर महाराष्ट्र तुमचे कुटुंब असेल, तर या सर्व गोष्टी उपलब्ध करणे, रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार करणे, त्यांना बरं करणे ही तुमची तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात जाऊन बसत आहात, स्वतःला लॉकडाऊन करून घेतले आहे. मातोश्रीच्या बाहेर पडत नाही, मग कोरोना होईल कसा, असे रोखठोक सवाल नारायण राणे यांनी केले आहेत. 

केंद्रावर आरोप करा व आपलं पाप झाका, ठाकरे सरकार एवढंच करतंय; विखे-पाटील आक्रमक 

राधाकृष्ण विखे-पाटील आक्रमक

राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा चिमटा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काढला आहे. नियोजनशून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. नगर जिल्ह्यात ४ मंत्री आहेत. इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात ते एकही कोविड रुग्णालय सुरू करू शकलेले नाहीत. जिल्ह्यातील सर्व मंत्री करतात काय, असा संतप्त सवाल विखे-पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या असून, राज्याला पुरेसे लसीचे डोस मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारकडून वारंवार केली जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून पुरेसे लसीचे डोस दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.
 

Web Title: bjp narayan rane slams uddhav thackeray over corona situation in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.