"...तर गावाला एक रुपयाही निधी देणार नाही", प्रचारादरम्यान भाजपा आमदार नितेश राणेंची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 01:06 PM2022-12-12T13:06:35+5:302022-12-12T13:07:21+5:30

BJP MLA Nitesh Rane: गेल्या काही दिवसांमध्ये महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून भाजपाचे एकापाठोपाठ एक नेते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यातच आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे.

...BJP MLA Nitesh Rane threatened during the campaign that he will not fund even a single rupee to the village | "...तर गावाला एक रुपयाही निधी देणार नाही", प्रचारादरम्यान भाजपा आमदार नितेश राणेंची धमकी

"...तर गावाला एक रुपयाही निधी देणार नाही", प्रचारादरम्यान भाजपा आमदार नितेश राणेंची धमकी

Next

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून भाजपाचे एकापाठोपाठ एक नेते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यातच आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका गावामध्ये निवडणुकीचा प्रचार करत असताना नितेश राणे यांनी गावात भाजपाचा सरपंच निवडून आला नाही तर एक रुपयाही निधी देणार नाही, असा इशारा दिला आहे. नितेश राणे यांचे हे भाषण आता व्हायरल होऊ लागले आहे. 

कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रसारासाठी आले असताना आमदार नितेश राणे यांनी मतदारांना संबोधित करताना हे विधान केले, ते म्हणाले की, सरपंचपदावर बसले तर त्या पदाला न्याय देईल, अशी व्यक्ती आम्ही सरपंचपदासाठी उमेदवार म्हणून दिली आहे. केवळ नामधारी उमेदवार दिलेला नाही. गावचा विकास करेल, गरज पडल्यास माझ्याशी बोलेल. राणे साहेबांशी बोलेल. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलेल, अशी व्यक्ती आम्ही उमेदवार म्हणून दिली आहे. नांदगाव हे महामार्गाला लागून असलेलं गाव आहे. येथे जेव्हा साईड रोड बनेल तेव्हा दोन्ही बाजूंनी विकास होईल, तेव्हा येथे आपल्या विचारांचा सरपंच असणं आवश्यक आहे. या गोष्टी तुम्ही कार्यकर्ते म्हणून लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवावं म्हणून मी स्पष्टपणे सांगितलं. 

नितेश राणे पुढे म्हणाले की, मी  आणखी महत्त्वाचा एक मुद्दा स्पष्टपणे सांगतो तो म्हणजे जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल त्या गावाचाच विकास मी करणार अन्यथा विकास करणार नाही. मी अगदी स्पष्टपणे सांगतो. माझ्याकडे आकडेमोड आहे. आपण लपवाछपवी करत नाही. आम्ही नारायण राणेंच्या तालमीत तयार झालेले विद्यार्थी आहोत. आम्ही पोटात एक ओठात एक असं करत नाही. चुकूनही येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एक रुपयाही देणार नाही, याची काळजी मी निश्चितपणे घेईन. आता याला तुम्ही धमकी समजा किंवा काहीही समजा. कारण आता सगळा निधी माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजन, ग्रामविकास, २५:१५ निधी असो किंवा केंद्र सरकारचा निधी असो. मी सत्तेत असलेला आमदार आहे. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असोत किंवा मुख्यमंत्री असोत मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. त्यामुळे नितेश राणेंच्या विचारांचा सरपंच निवडून दिला नाही तर विकास होणार नाही, निधी येणार नाही, हे समजून घ्या, असे नितेश राणे म्हणाले. 

Web Title: ...BJP MLA Nitesh Rane threatened during the campaign that he will not fund even a single rupee to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.