Chandrashekhar Bawankule Reaction On ZP Election 2026 Result: भाजपा हा महाराष्ट्रात एक नंबरचा पक्ष ठरेल, असे यापूर्वीच म्हणालो होतो. महानगरपालिका प्रमाणेच जिल्हा परिषदेत जवळपास आठ जागेवर भाजपाचे अध्यक्ष असतील. डबल इंजन सरकार जनतेपर्यंत घेऊन गेलो. जिल्हा परिषदेतही नवीन विकसित ग्रामीण महाराष्ट्र या माध्यमातून कामे होणार आहे. हे जनतेपर्यंत घेऊन गेलो. निवडणूक प्रचारादरम्यान ग्रामीण जनता राज्य आणि केंद्र सरकारच्या पाठीशी उभी राहिली, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
महाविकास आघाडी खाली गेली आहे. आता टीका टिप्पणीवर महाराष्ट्र मत देत नाही. विकासाला मतदान करते. काँग्रेसने टीका टिप्पणी आणि निगेटिव्ह प्रचार केला. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारले. शरद पवारही महाविकास आघाडीला मार्गदर्शन करण्यात कमी पडले. महाविकास आघाडीसाठी वाईट निकाल आले आहे. त्यांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे, असे ते म्हणाले.
अजितदादांना मत म्हणजेच महायुतीला मत
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पुणे जिल्हा अजितदादाच्या पाठीशी होताच. पुणे जिल्ह्याने जे मत दिले ते अजितदादांना मिळालेला मत आहे, ते मत महायुतीलाच मिळालेले आहे. महायुती महाराष्ट्रात येणार आहे. काही जिल्हा परिषदेवर अजितदादांचे तर काही ठिकाणी शिंदे सेनेचे तर काही जागेवर भाजपाचे अध्यक्ष बसतील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, लातूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले. राज्यातील सत्तेत प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने सर्वाधिक जिल्हा परिषदांमध्ये सत्ता मिळवली आहे. महायुतीतील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही काही ठिकाणी यश मिळाले आहे.
Web Summary : Bawankule stated that BJP will be the top party in Maharashtra. He attributed Mahayuti's success in ZP elections to the double-engine government and rural support. He added Ajit Pawar's victory signifies Mahayuti's win. BJP secured the most ZP wins, followed by Shinde Sena and NCP (Ajit Pawar).
Web Summary : बावनकुले ने कहा कि भाजपा महाराष्ट्र में शीर्ष पार्टी होगी। उन्होंने जिला परिषद चुनावों में महायुति की सफलता का श्रेय डबल इंजन सरकार और ग्रामीण समर्थन को दिया। उन्होंने कहा कि अजित पवार की जीत महायुति की जीत का प्रतीक है। भाजपा ने सबसे अधिक जिला परिषदें जीतीं, उसके बाद शिंदे सेना और एनसीपी (अजित पवार) का स्थान रहा।