शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

भाजप गुंडांचा पक्ष बनतोय - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 18:01 IST

पिंपरी चिंचवडच्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 17 - पिंपरी चिंचवडच्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. भाजप आता गुंडांचा पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. भाजपने सर्रास गुंडापुंडांनाही पक्षात प्रवेश दिले आहेत, असे अजित पवार पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. 
भाजपने जाणीवपूर्वक उमेदवार आयात केले आहेत. भाजपने गुंडांचा पक्ष म्हणून ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे गुंडांच्या प्रवेशावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा नाराज आहे, असे अजित पवार म्हणाले. आझम पानसरेंनी राष्ट्रवादी का सोडली याबाबत काही माहिती नाही, मात्र त्यांच्यावर राष्ट्रवादीने कोणताही अन्याय केला नाही, असेही ते म्हणाले.  
महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आघाडीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, सन्मानपूर्वक आघाडी झाल्यास आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ. तसेच उमेदवारांची निवड करण्यासाठी अंतिम टप्प्यावर काही वेळ घेत आहोत. यावर सर्व कार्यकर्त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या सहमतीने निर्णय घेण्यात येईल. या ठिकाणी आम्ही चांगले काम केलं आहे. तसेच, आपणहून कुणाच्या वाटेला जाणार नाही आणि कुणी आमच्या वाटेला आलं तर बघ्याची भूमिका घेणार नाही. वेळेप्रसंगी आरे ला कारे करु, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.  
(नोटाबंदीच्या निर्णयाअगोदर नियोजन आवश्यक होते - अजित पवार)