शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भाबाबत मोदींच्या वक्तव्याने भाजपा नेत्यांची गोची

By admin | Updated: October 8, 2014 04:30 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याच्या राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा करणाऱ्या भाजपा नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उघडे पाडले

मुंबई : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्याच्या राणाभीमदेवी थाटाच्या घोषणा करणाऱ्या भाजपा नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उघडे पाडले. आपल्यावरील महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे कारस्थान रचल्याचे आरोप झटकण्याकरिता मोदींनी आपण दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे पाडू देणार नाही, अशी घोषणा केली. यामुळे भाजपातील स्वतंत्र विदर्भवादी नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे.मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढणे आणि स्वतंत्र विदर्भ या दोन मुद्द्यांवरून शिवसेनेने केलेल्या टीकेमुळे मोदी अक्षरश: घायाळ झाले. लोकसभा निवडणूक प्रचारात काँग्रेसवर हल्ले करताना दिसलेले मोदी महाराष्ट्रात ‘खुलासा मोड’मध्ये गेलेले दिसले. दोंडाईचा (जि. धुळे) येथील सभेत मोदी म्हणाले की, मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही. वेगळा विदर्भ व मुंबईवरून आपल्यावर आरोप केले जातात. परंतु मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून, मुंबईशिवाय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राशिवाय देश अपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे कुणी तुकडे करू शकत नाही. काही लोक खोटारडा प्रचार करीत आहेत.मोदींनी स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेपासून घूमजाव केल्याने विदर्भातील व विशेषकरून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गोची झाली आहे. आम्ही स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर कायम असून, छोट्या राज्यांबाबत आमची भूमिका कायम आहे. मोदी केवळ मुंबईबाबत बोलत होते, अशी सारवासारव भाजपाने केली. परंतु महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही हे मोदी यांचे विधान मुंबई व विदर्भाला लागू होते. विदर्भातील नेत्यांनी स्वतंत्र राज्याच्या निर्मितीचे आश्वासन जाहीर सभांमधून दिले असल्याने विदर्भाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर विदर्भात काँग्रेसला धक्का देण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. आता मोदींच्या वक्तव्यामुळे विदर्भातील मतदारांत संभ्रम निर्माण झाला आहे.नागपुरात मोदींचे मौन उपराजधानीतील निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगळ्या विदर्भाबाबत काय वक्तव्य करतात, याकडे विदर्भवाद्यांसोबतच विरोधकांचेदेखील लक्ष लागले होते. मात्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर ब्र शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भवाद्यांची निराशा झाली.