ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत?; भाजपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 09:05 PM2021-03-24T21:05:10+5:302021-03-24T21:07:14+5:30

Param Bir Singh Letter and Sachin Vaze Case: आता ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे.

bjp leader madhav bhandari slams thackeray govt over sachin vaze and param bir singh letter issue | ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत?; भाजपचा सवाल

ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत?; भाजपचा सवाल

Next
ठळक मुद्देसचिन वाझे प्रकरणी भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणाठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत - भाजपचा सवालअनिल देशमुखांवरील आरोप गंभीर, हे सुप्रीम कोर्टानेही मान्य केलंय - भाजप

मुंबई :सचिन वाझे (Sachin Vaze Case) प्रकरणानंतर माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता, भाजप आणि अन्य पक्षांकडून महाविकास आघाडी सरकारला जोरदार घेरले जात आहे. यानंतर आता ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत, असा सवाल भाजपकडून करण्यात आला आहे. (bjp leader madhav bhandari slams thackeray govt over sachin vaze and param bir singh letter issue)

ठाकरे सरकारची कार्यपद्धती या प्रकरणांवरून स्पष्ट झाली आहे. ज्या अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या कारणांखाली निलंबनाची कारवाई झाली आहे, अशा अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या आणि त्यांच्याकडून वाझेंकरवी जी कामे करून घेतली जात होती. ती कामे करून घ्या, अशी महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती असल्याचे दिसते. सचिन वाझे यांच्यासारखे किती अधिकारी ठाकरे सरकारमध्ये दडले आहेत, अशी विचारण माधव भांडारी यांनी  केली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकावर टीका केली. तसेच सचिन वाझे, परमबीर सिंगांचे पत्र आणि अनिल देशमुख या मुद्यांवर यावेळी भाष्य केले.

सगळं विकून आम्ही देश चालवत नव्हतो; नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

अनिल देशमुखांवरील आरोप गंभीर

परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असला, तरी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितली आहे. परंतु, यावेळी अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आरोप गंभीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. देशमुख यांना याचिकेत पक्षकार करून घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसे झाल्यास देशमुख यांच्या उलटतपासणीतून अनेक घटनांवर प्रकाश पडेल, असा दावा भांडारी यांनी यावेळी केला आहे. 

लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले?; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना सवाल

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. भाजपाने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. तर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या नेत्यांनी भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्षांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. 

Web Title: bjp leader madhav bhandari slams thackeray govt over sachin vaze and param bir singh letter issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.