Coronavirus : "पटोलेजी... प्रियंका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 03:03 PM2021-04-22T15:03:51+5:302021-04-22T15:08:08+5:30

प्रियंका गांधींच्या तज्ज्ञतेचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल हे पाहावं, भाजपनं दिला सल्ला. 

bjp leader keshav upadhye slams nana patole said take advice of priyanka gandhi sve maharashtra coronavirus pandamic | Coronavirus : "पटोलेजी... प्रियंका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा"

Coronavirus : "पटोलेजी... प्रियंका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा"

Next
ठळक मुद्देप्रियंका गांधींच्या तज्ज्ञतेचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल हे पाहावं, भाजपनं दिला सल्ला. प्रियंका गांधी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केंद्रावर साधला होता निशाणा

"कोरोनाची महाराष्ट्रातील स्थिती अतिशय भयानक होत आहे. महाविकास आघाडी सरकार पुरते अपयशी ठरले आहे. स्वतः काहीच करायचे नाही आणि काहीही झाले की केंद्राच्या नावाने खडे फोडायचे, हा एकमेव उद्योग केला जात आहे. अशात  प्रियंका गांधी एक मोठी मुलाखत दिलेली आहे. काय केले पाहिजे, याचे त्यांचे ज्ञान पाहता हवे तर त्यांची मदत घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा," असा सल्ला भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांना नाना पटोले यांना दिला आहे. 

"केंद्र सरकारने महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन दिला, सर्वाधिक रेमडेसिवीरचा कोटा महाराष्ट्राला दिला. हा कोटा किती रुग्ण कोणत्या राज्यात ऑक्सिजनवर आहेत, हे पाहून दिलेला आहे. सुरुवातीपासून सर्वाधिक मदत मिळत असताना केवळ बोंबा करण्याचे काम वगळता महाविकास आघाडी सरकारने काहीही केलेले नाही. सर्वाधिक मदत मिळूनही सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात अशीच स्थिती आहे. त्यामुळे हवे तर डॉ. मनमोहन सिंग यांनी लिहिलेल्या सर्व सूचना राज्यात अंमलात आणा, प्रियंका गांधी यांना काही दिवस राज्यात बोलवा, पण महाराष्ट्रातील स्थिती आता आटोक्यात आणली पाहिजे," असं उपाध्ये म्हणाले.

"बाकी विरोधी पक्ष म्हणून आणि केंद्रातील सरकारसुद्धा सुरूवातीपासून राजकारण न करता महाराष्ट्रासोबत आहे आणि यापुढे पण राहील. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांची चिंता तर अजिबात करू नका. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा करून आतापर्यंत अनेक बाबतीत राज्याला मदतच केली आहे आणि यापुढेही करतील. आपण प्रियंका गांधी यांच्या तज्ज्ञतेचा फायदा महाराष्ट्राला कसा मिळेल, तेवढे फक्त पहा," असा सल्ला सुद्धा केशव उपाध्ये यांनी नाना पटोले यांना दिला आहे.

काय म्हणाल्या होत्या प्रियंका गांधी?

"रेमडेसिवीरसाठी लोक वणवण फिरत आहेत. गेल्या सहा महिन्यात १० लाखांहून अधिक रेमडेसिवीरची निर्यात करण्यात आली. सरकारने गेल्या तीन महिन्यात सहा कोटी लसींची निर्यात केली," असे प्रियंका गांधी म्हणाल्या. "लसीकरणात तुम्ही देशवासीयांना प्राधान्य का दिलं नाही? तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात. कोरोनाची लस मॉरिशिअस, नेपाळला जात असल्याचे आम्ही पाहात होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लसी दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच तुटवडा जाणवत आहे," अशी टीकाही प्रियंका गांधी यांनी केली होती.

Web Title: bjp leader keshav upadhye slams nana patole said take advice of priyanka gandhi sve maharashtra coronavirus pandamic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.