शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

... ना काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला असं चित्र आहे हे; भाजपचा पटोलेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 11:59 IST

Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेत खळबळजनक आरोप केला होता.

ठळक मुद्देमहाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेत खळबळजनक आरोप केला होता.भाजपनं लगावला जोरदार टोला.

फोन टॅपिंगच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेत खळबळजनक आरोप केला होता. २०१६-१७ मध्ये आपण भाजप खासदार असताना आपला फोन टॅप केला जात होता, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, या प्रकरणावरून भाजपनं पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. ना काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला, असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला आहे. 

"नाना पटोले काय ही तुमची अवस्था. काँग्रेसमुळे जे सत्तेत आहेत, तेच प्रदेशाध्यक्षांविरोधात काम करत आहेत. थेट प्रदेशाध्यक्षांवर उद्धव ठआकरे, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार यांची पाळत. फोन टॅप तरी काँग्रेस गप्प... ना सत्तेत काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला, असं चित्र आहे हे," असं म्हणत उपाध्ये यांनी पटोलेंना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पटोलेंना टोला लगावला. काय म्हणाले होते पटोले?"मी स्वबळाचा नारा दिला, तर सर्वांच्या पोटात गोळा आला. आता मुख्यमंत्री शिवेसेना म्हणून कामाला लागा हे सांगतात. तेव्हा सर्वांना गोड वाटतं. महाराष्ट्र काँग्रेसमय करण्याचा माझा मानस आहे. पण मला ही व्यवस्था सुखानं जगू देणार नाही. माझे फोन टॅप केले जातात. मी काय बोलतोय, कुठे जातोय याचा सर्व अहवाल मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उमुख्यमंत्र्यांना आयबीकडून दिला जातो. काँग्रेस मोठी होती हे त्यांना खपत नाही. त्यासाठी पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना ताकदीनं उत्तर द्यायचं आहे. त्रासाला ताकद बनवा,आत्मविश्वासानं पुढे जा आणि संघटना बांधणीवर भर द्या. २०२४ मध्ये काँग्रेस राज्यात स्वबळावर येणार," असं पटोले यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलAjit Pawarअजित पवार