...तोपर्यंत पक्ष फक्त बाप लेकांचाच उरेल; गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 16:18 IST2023-02-23T16:17:20+5:302023-02-23T16:18:10+5:30

पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.

bjp leader gopichand padalkar targets uddhav thackeray aaditya thackeray shiv sena bow and arrow eknath shinde ncp sharad pawar | ...तोपर्यंत पक्ष फक्त बाप लेकांचाच उरेल; गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

...तोपर्यंत पक्ष फक्त बाप लेकांचाच उरेल; गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर अनेक स्तरातून या निर्णयावर टीका करण्यात आली, तर काहींनी हा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडलाय.

“उबाठा पक्ष प्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत त्यांचा पक्ष कदाचित फक्त बाप लेकांचाच उरेल!” असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

यापूर्वीही केली होती टीका
विरोधी पक्षात असताना एकही आमचा आमदार फुटत नाही. पवारांची सत्ता गेल्यानंतर लगेच आमदार पळायला लागतात. मुख्यमंत्री असणाऱ्या शिवसेनेचे ५० आमदार गेले. अडीच वर्षात आमचा एकही आमदार म्हटला नाही मला पक्ष सोडायचा आहे. आम्ही विचाराने काम करतोय. आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबावाखाली येऊन पक्षांतर करतोय असं म्हटलं नाही. त्यामुळे सरकार पूर्ण मजबूत आहे, काही चिंता करू नका असं यापूर्वी पडळकर म्हणाले होते.

शरद पवार आणि संजय राऊत या फाटक्या आणि जीर्ण झालेल्या नोटा आहेत. चलनात न चालणाऱ्या नोटा आहेत. पवारांचा चेहरा आधीच विश्वासघाताने, गद्दारीने आणि पाठीत खंजीर खुपसण्यानं कालवंडलेला होता. मागच्या महिन्यात त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केले होते. फडणवीसांनी एकच विधान केल्यानं पवारांचा कालवंडलेला चेहरा आता डांबरासारखा काळा झाला अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे. 

Web Title: bjp leader gopichand padalkar targets uddhav thackeray aaditya thackeray shiv sena bow and arrow eknath shinde ncp sharad pawar