शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

Gopichand Padalkar On Shivsena: 'संजय राऊत यांनी शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा विडा उचललेला दिसतोय'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 11:39 AM

संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरात प्रियंका गांधी यांची तुलना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे.

मुंबई: भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सामानातील रोखठोक सदरात लिहलेल्या लेखावरुन पडळकर यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी उत्त प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचारावरुन केंद्र सरकारवर टीका केली. तसेच, यात त्यांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची तुलना थेट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे.

त्यावरुनच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. 'जनाब संजय राऊत यांनी सामनाचे रुपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय', असे पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

संजय राऊत काय म्हणाले सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत म्हणतात की, लखीमपूर खेरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. ईडी, सीबीआयसारख्या तपासयंत्रणा कुणालाही अटका करीत आहेत. पण चार खून पचवून जगातला सर्वांत मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडवण्याचे काम प्रियांका गांधी यांनी केले. इंदिराजींचे अस्तित्व यानिमित्ताने पुन्हा दिसले. प्रियांका गांधींमध्ये थेट भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच झलक दिसते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतGopichand Padalkarगोपीचंद पडळकरPriyanka Gandhiप्रियंका गांधीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार