"खाई त्याला खवखवे"; भाजपा नेत्याचा रोहित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 07:07 PM2021-01-05T19:07:32+5:302021-01-05T19:09:57+5:30

कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल असं म्हणाले होते रोहित पवार

bjp leader atul bhatkhalkar criticize ncp leader rohit pawar his comment on ed notice | "खाई त्याला खवखवे"; भाजपा नेत्याचा रोहित पवारांना टोला

"खाई त्याला खवखवे"; भाजपा नेत्याचा रोहित पवारांना टोला

Next
ठळक मुद्देकदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होतं.मंगळवारी पहाटे रोहित पवारांनी दिली नवी मुंबईतील मार्केटला भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पहाटे चार वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट दिली. यावेळी कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल. ईडीच्या माध्यमातून भाजपाकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे, असं महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशीबाबत रोहित पवार म्हणाले. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी रोहित पवारांना टोला लगावला.

कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल या वक्तव्याचा समाचार घेताना भातखळकर यांनी रोहित पवार यांना 'खाई त्याला खवखवे' असं म्हणत टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. 

काय म्हणाले होते रोहित पवार?

"उद्या मलाही ईडी नोटीस पाठवेल. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे," असं रोहित पवार महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशीबद्दल रोहित पवार म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. रोहित पवार यांनी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. तसेच केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. मात्र, राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, अस आश्वासन रोहित पवार यांनी दिले आहे. याशिवाय, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भूमिका हुकूमशाहीची असल्याचे रोहित पवार म्हणाले.

Web Title: bjp leader atul bhatkhalkar criticize ncp leader rohit pawar his comment on ed notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.