CoronaVirus: “घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी; राऊतसाहेब, डोळे उघडा...”

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:06 PM2021-05-14T16:06:34+5:302021-05-14T16:08:11+5:30

CoronaVirus: देशाचे सरकार रामभरोसे आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

bjp keshav upadhye replied sanjay raut over allegations on central govt | CoronaVirus: “घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी; राऊतसाहेब, डोळे उघडा...”

CoronaVirus: “घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी; राऊतसाहेब, डोळे उघडा...”

Next
ठळक मुद्देसंजय राऊत यांना भाजपकडून प्रत्युत्तरघरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासीकेशव उपाध्ये यांचा ट्विटरवरून पलटवार

मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असली, तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाची चिंता कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. देशाचे सरकार रामभरोसे आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (bjp keshav upadhye replied sanjay raut over allegations on central govt)

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत, या देशात सरकार, प्रशासन, प्रधानमंत्री, आरोग्यमंत्री आहेत. पण ज्याप्रकारे मृत्यू होत आहेत. गंगा नदीत हजारोंच्या संख्येने मृतदेह मिळत आहेत, हाहाःकार माजला आहे ते पाहता देश रामभरोसे आहे, अशी टीका केली होती. याला आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे. 

धक्कादायक! उत्तर प्रदेशात ‘आऊट ऑफ डेट’ किटने १० हजार चाचण्या; बहुतांश रिपोर्ट निगेटिव्ह

घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी

राऊतजी, एवढे अगतिक का? घरबसल्या आभासी कारभार करणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारला असे आडून टोमणे मारणे त्यांच्यातील राजकारण्याला शोभत असले, तरी त्यांनी आपल्यातील पत्रकाराला जाब विचारला पाहिजे. राज्याचा आंधळा कारभार पाहण्याएवढा डोळसपणा त्यांच्यातील पत्रकाराने तरी दाखविला पाहिजे. राऊतसाहेब, डोळे उघडा… देशात कोरोनाचा हाहाःकार उडाला त्यात सर्वाधिक महाराष्ट्राचा वाटा आहे, हे कस विसरून चालेल? या कठिण परिस्थितीत जनतेला मदत करण्याऐवजी मंत्री अधिकाऱ्यावरून भांडत आहेत, पीआर कंत्राट दिली जात आहेत… किती यादी सांगू?, अशी विचारणा केशव उपाध्ये यांनी केली आहे. 

असे याआधी देशात कधीच झाले नव्हते

प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतही परिस्थिती वाईट आहे. तिथे सुद्धा ऑक्सिजनअभावी लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पंतप्रधान, गृहमत्री, आरोग्यंत्री, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अहंकार आणि राजकारण विसरुन एकमेकांशी चर्चा करत एकत्र काम केले, तरच देशातील स्थिती सुधारू शकते. प्रधानमंत्री, केंद्र सरकार जागेवरच आहे, पण त्यांचे अस्तित्व दिसणे महत्त्वाचे आहे. अदृश्यपणे काम करून चालणार नाही. हा देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरू आहे. ज्या पद्धतीने गंगा, यमुनेत प्रेतांचा खच पडलेला आहे, मृतदेह वाहून येत किनाऱ्यावर लागली आहेत. त्यांच्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार ही करता येत नाही. हे असे याआधी देशात कधीच झाले नव्हते, असा घणाघात संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता.

गाझा सीमेवर इस्रायलने पाठवले सैन्य; आता जमिनीवरून युद्ध होण्याची शक्यता!

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळाले आहे.  राज्यात आजपर्यंत एकूण ४६ लाख ५४ हजार ७३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.३४% एवढे झाले आहे. तर गुरुवारी दिवसभरात ४२ हजार ५८२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ८५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. 
 

Web Title: bjp keshav upadhye replied sanjay raut over allegations on central govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.