Israel-Palestine Clash: गाझा सीमेवर इस्रायलने पाठवले सैन्य; आता जमिनीवरून युद्ध होण्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 03:11 PM2021-05-14T15:11:34+5:302021-05-14T15:13:47+5:30

Israel-Palestine Clash: इस्रायलने जमिनीवर लढायला सैन्य पाठवले असून, त्यामुळे युद्धाची शक्यता आणखी वाढली आहे, असे सांगितले जाते.

israel palestine clash now israel sends troops to gaza border | Israel-Palestine Clash: गाझा सीमेवर इस्रायलने पाठवले सैन्य; आता जमिनीवरून युद्ध होण्याची शक्यता!

Israel-Palestine Clash: गाझा सीमेवर इस्रायलने पाठवले सैन्य; आता जमिनीवरून युद्ध होण्याची शक्यता!

Next
ठळक मुद्देइस्रायलने जमिनीवर लढायला सैन्य पाठवले असून, त्यामुळे युद्धाची शक्यता आणखी वाढली आहे, असे सांगितले जाते.

जेरूसलेम: गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाइन अतिरेक्यांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. हमासने इस्रायलच्या (Israel) दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली होता. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. आतापर्यंत दोन्ही गटांमधील लढाई फक्त हवाई हल्ले आणि रॉकेट गोळीबारापर्यंत मर्यादित होती. परंतु, आता इस्रायलने जमिनीवर लढायला सैन्य पाठवले असून, त्यामुळे युद्धाची शक्यता आणखी वाढली आहे, असे सांगितले जाते. (israel palestine clash now israel sends troops to gaza border)

 एएफपीच्या अहवालानुसार, इस्रायल हल्ल्याच्या धमकीमुळे बरेच लोक गाझामध्ये घरे सोडून जात आहेत. इस्रायलच्या सुरक्षा दलांनी गेल्या आठवड्यात जेरूसलेममधील अल-अकसा मशिदीतील नमाज अदा करणाऱ्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर  हिंसाचार उफाळून आला होता. दरम्यान गाझाच्या सीमेवरच्या भूमीवर लढा देण्यासाठी इस्रायलने आपले सैन्य पाठवले आहे. 

इस्रायलकडून वृत्ताला दुजोरा

इस्रायल सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, इस्रायल विमान आणि जमिनीवरून सैन्य गाझा पट्टीवर हल्ला करीत आहेत. इस्रायल लष्कराचे प्रवक्ते जॉन कॉनरिकस यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्रायलच्या सैन्याने सांगितले की, शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात सैन्य आणि हवाई दल यांचा सहभाग होता. परंतु, सैन्याने गाझामध्ये प्रवेश केला नव्हता. बीबीसीच्या अहवालानुसार, गाझा सीमेवर लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टरद्वारे तीव्र हल्ले होत आहेत. तेथे जोरदार गोळीबार सुद्धा सुरू आहे.

लाईव्ह शोदरम्यान अचानक झाला बॉम्बब्लास्ट; समोर आला अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ 

१० मेपासून चकमक सुरू

पॅलेस्टाइन आणि इस्रायलच्या सुरक्षा दलांमधील चकमक १० मेपासून जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत सुरू झाली. त्यात १२ पॅलेस्टिनी आंदोलक जखमी झाले. इस्रायलने पूर्व जेरुसलेममधील शेख जर्रा येथून पॅलेस्टाइन कुटुंबांना काढून टाकण्याच्या योजनेमुळे पॅलेस्टाईन लोकही संतप्त झाले. त्यामुळे पॅलेस्टाईन अतिरेकी गट इस्रायल येथे रॉकेट हल्ले करत आहे. परंतु इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझाला जेवढे नुकसान होत आहे. तेवढे नुकसान इस्रायलची क्षेपणास्त्र यंत्रणांना होत नाही आहे. गाझावर झालेल्या इस्रायलच्या हल्ल्यात सुमारे ८३ जण ठार झाले असून, यात १७ मुलांचा समावेश आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने केलेल्या हल्ल्यात शेकडो जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: israel palestine clash now israel sends troops to gaza border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.