Chitra Wagh : "कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळ पण हातात हात घेऊन सुरू केलाय सत्तेसाठी खेळ"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 01:02 PM2023-09-01T13:02:58+5:302023-09-01T13:20:49+5:30

BJP Chitra Wagh : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

BJP Chitra Wagh slams india alliance meeting and Uddhav Thackeray | Chitra Wagh : "कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळ पण हातात हात घेऊन सुरू केलाय सत्तेसाठी खेळ"

Chitra Wagh : "कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळ पण हातात हात घेऊन सुरू केलाय सत्तेसाठी खेळ"

googlenewsNext

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी 28 विरोधी पक्षांचे प्रमुख नेते मुंबईत हजर झाले आहेत. या बैठकीत जागावाटपासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ही बैठक मुंबईतील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये होत असून, यासाठी हॉटेलमध्ये सुमारे 200 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यावरून भाजपाने हल्लाबोल केला आहे. "पोटात एक अन् ओठात एक, कसले पुरोगामी नि कसले डावे, खुर्चीसाठी ज्यांचा प्राण तळमळे, अशा घोटाळेबाजांना काय म्हणावे?" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"इथं कोणाच्याच विचारांचा कोणाशी बसत नाही मेळ पण, हातात हात घेऊन सुरू केलाय सत्तेसाठी खेळ" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर देखील घणाघात केला आहे. ."#घमंडिया_आघाडी पंतप्रधान मोदीजी विरोधात लढायला निघाले आहेत पण त्यांचा सेनापतीच अजून ठरत नाहीये.." असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

"#घमंडिया आघाडीचा 
खेळ भरलाय न्यारा
संधिसाधूंचा मुंबापुरीत 
जमलाय गोतावळा सारा

इथं कोणाच्याच विचारांचा 
कोणाशी बसत नाही मेळ
पण, हातात हात घेऊन 
सुरू केलाय सत्तेसाठी खेळ 

पोटात एक अन् ओठात एक, 
कसले पुरोगामी नि कसले डावे
खुर्चीसाठी ज्यांचा प्राण तळमळे
अशा घोटाळेबाजांना काय म्हणावे?

जनतेच्या ऊरावर बसलीत 
केव्हापासून ही भ्रष्ट घराणी
पाप धुण्याही कमीच पडेल
ह्या अरबी समुद्राचे पाणी..." असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"#घमंडिया_आघाडी पंतप्रधान मोदीजी विरोधात लढायला निघाले आहेत पण त्यांचा सेनापतीच अजून ठरत नाहीये.. राहुल गांधीचं नाव घेतलं की ममता बॅनर्जी नाराज होते.. केजरीवालचे नाव घेतले की राहुल गांधी नाराज होतात… ममता बॅनर्जीचं नाव घेतलं की नितीश कुमार नाराज होतात... नितीश कुमारांचं नाव घेतलं की उद्धव ठाकरे नाराज होतात.... आणि उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं की सगळेच नाराज होतात."

"या ठगबंधनात उद्धव ठाकरे हे संपलेल्या पक्षाचे नेते आहेत. ओसाड गावचे पाटील म्हणून उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित आहेत. पण त्यांच्यावर कोणाचाही विश्वास नाहीए. आत्मविश्वास गमावलेले विरोधक एकत्र आले आहेत. त्यांना विश्वास आहे की मोदींना विरोध केला तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल. यातून कळतंय की घमंडिया आघाडी आतून किती पोकळ आहे" असं देखील चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 


 

Web Title: BJP Chitra Wagh slams india alliance meeting and Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.