"छायाचित्रकार असलेल्या मुख्यमंत्र्यांचा 'फोकस' चित्रकार, शिल्पकारांकडे का नाही वळला?"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 03:01 PM2021-10-23T15:01:29+5:302021-10-23T15:08:50+5:30

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government : राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांच्या शिष्टमंडळाने आज आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली.

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Maharashtra issues | "छायाचित्रकार असलेल्या मुख्यमंत्र्यांचा 'फोकस' चित्रकार, शिल्पकारांकडे का नाही वळला?"

"छायाचित्रकार असलेल्या मुख्यमंत्र्यांचा 'फोकस' चित्रकार, शिल्पकारांकडे का नाही वळला?"

Next

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः छायाचित्रकार असतानाही राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांवर त्यांचा "फोकस" का नाही वळला असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी राज्य शासनाने या चित्रकार आणि शिल्पकारांना मदत करावी अशी मागणी केली आहे. राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांच्या शिष्टमंडळाने आज आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. यामध्ये जयंत पटेल, रमेश थोरात यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश होता.

पत्रकारांना माहिती देताना शेलार यांनी राज्यात सुमारे 10 हजार चित्रकार, शिल्पकार दरवर्षी प्रदर्शन करुन आपली कला सादर करतात. तसेच त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण कोरोना काळात गेल्या दिड वर्षात प्रदर्शने होऊ शकली नाहीत. आपल्या राज्याला, देशाला कलेच्या माध्यमातून समृद्ध करणाऱ्या या कलावंताचा अशावेळी राज्य सरकारने संवेदनशील पणे विचार करण्याची गरज होती असं म्हटलं आहे. कर्नाटक, चंदिगड सारख्या राज्यांनी आप-आपल्या राज्यातील कलावंताना मदत केली. महाराष्ट्रात तर स्वतः मुख्यमंत्री छायाचित्रकार आहेत पण या उपेक्षित घटकाकडे त्यांचा फोकस वळला नाही याची आठवण करुन देण्यासाठी आज आम्ही राज्यपालांची भेट घेतली, असे त्यांनी सांगितले. तसेच या कलावंताना सरकारने मदत करावी अशी मागणी केल्याची माहिती दिली.

"महाराष्ट्राची बदनामी होत आहे"

"ज्याचा जावई पकडला गेला त्या मंत्र्याला लाथ मारून मंत्रिमंडळातून हाकलले पाहिजे. अशा मंत्र्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. दारू आणि गुत्याच्या वसुलीत अधिकारी लावले जातात. मग अधिकाऱ्यांना अटक झाल्यावर ते पोपटासारखे बोलू लागतात. बार आणि गुत्यांमधून वसुली कशी करायला लावली हे सांगतात. त्यातून महाराष्ट्राची बदनामी होत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो, देशात कायदा सुव्यवस्थेचं राज्य सुरू आहे. महाराष्ट्रातही तेच अपेक्षित आहे."

"काम करुंगा नही आणि करने दुंगा भी नही’ हा सरकारचा नारा आहे का?"

"महाराष्ट्राचा नारा काही तरी वेगळा दिसतोय. काम करुंगा नही आणि करने दुंगा भी नही असा काही नारा आहे का? स्वत: काही काम करायचे नाही. यंत्रणांना काम करू द्यायचे नाही. भ्रष्टाचाराविरोधात बोलायचे नाही, भ्रष्टाचाराचे पुरावे द्यायचे नाही, गांजामध्ये अटक झालेल्यांवर कारवाई करायची नाही, महिलांवरील अत्याचाराबाबत बोलायचे नाही… हे सर्व प्रश्न मांडले तर महाराष्ट्राची बदनामी होत असल्याची ढाल पुढे करायची. यातून मुख्यमंत्री तुम्ही स्वत:चं पाप लपवू शकत नाही" अशी प्रतिक्रिया शेलार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिली आहे. 
 

Web Title: BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Maharashtra issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app