भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 23:16 IST2025-11-05T23:07:40+5:302025-11-05T23:16:50+5:30
भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली.

भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपाने आज राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर केली. सर्वच जिल्ह्यांतील महत्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी महत्वाच्या नेत्यांवर देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर ठाणे शहर, ग्रामीण, कल्याण, उल्हासनगर, मीरा भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई या सर्व ठिकाणी गणेश नाईक निवडणूक प्रभारी असणार आहेत. शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात नाईक यांच्यावर जबाबदारी दिली आहे. मागील काही दिवसांपासून नाईक यांनी तयारी केल्याचे दिसत आहे.
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
निवडणुकीची घोषणा होताच भाजप मैदानात उतरले आहे. भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. बीड जिल्ह्यातही महत्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. बीड जिल्हा निवडणूक प्रमुख पदी आमदार सुरेश धस तर निवडणूक प्रभारी म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मंत्री गणेश नाईक, मत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावरही मोठी जबाबदारी दिली.
तर सातारा जिल्ह्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसल यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे, सांगली जिल्ह्यात आमदार सत्यजित देशमुख, कोल्हापुरात आमदार अमल महाडिक यांच्यावर जबाबदारी दिली आहे.
माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी स्थानिक स्वराज संस्था जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे.@RaviDadaChavan#BJP#Maharashtrapic.twitter.com/vpPv6F5izI
— भाजपामहाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 5, 2025