वाढदिवसाची तयारी जिवावर बेतली

By Admin | Updated: February 25, 2015 03:04 IST2015-02-25T02:39:09+5:302015-02-25T03:04:48+5:30

वाढदिवसाच्या तयारीसाठी लवकर पोहोचण्याच्या घाईत अवजड वाहनाला ओव्हरटेक करताना तरुणाला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी

Birthday Prepare for Bitley | वाढदिवसाची तयारी जिवावर बेतली

वाढदिवसाची तयारी जिवावर बेतली

मुंबई: वाढदिवसाच्या तयारीसाठी लवकर पोहोचण्याच्या घाईत अवजड वाहनाला ओव्हरटेक करताना तरुणाला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. सचिन राऊळ (२५) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी पालिकेच्या क्लीनअप ट्रक ड्रायव्हरला भांडुप पोलिसांनी अटक केली आहे.
मालाडचा येथे राहणारा सचिन इवेंटचे काम करतो. भांडुप टेभींपाडा येथे एका बर्थडे पार्टीच्या तयारीचे काम त्याला मिळाले होते. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सचिन चुलत भाऊ ऋषिकेशच्या पल्सर बाईकने भांडुपच्या दिशेने निघाला. बर्थडे पार्टीच्या तयारीसाठी लवकर पोहचणे गरजेचे असल्याने भांडुप नेपच्यून मॉल येथून जात असताना पुढे जाणाऱ्या पालिकेच्या क्लीनअप ट्रकला त्यांनी ओवरटेक करण्याचा प्रयत्न केला. या अपघातात सचिन गाडीच्या मागील चाकाखाली येऊन चिरडला गेला. तर ऋषिकेश जखमी झाला आहे. मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच सचिनचा मृत्यू झाला तर ऋषिकेशवर उपचार सुरु आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Birthday Prepare for Bitley