शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाईकस्वारांचा हलगर्जीपणा जिवावर

By admin | Updated: February 2, 2015 08:56 IST

मुंबईच्या दक्षिण भागात असणारी सरकारी आणि खासगी कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची संख्या पाहता या परिसरात मोठ्या

मुंबई : मुंबईच्या दक्षिण भागात असणारी सरकारी आणि खासगी कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची संख्या पाहता या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे बाईकस्वार आणि चारचाकी वाहनचालकांचा प्रवास सुकर व्हावा आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळावी यासाठी जे.जे. पूल उभारला. मात्र या पुलावरून जाताना काही बाईकस्वारांनी हलगर्जीपणाचे दर्शन दिले आणि त्याचाच फटका अन्य बाईकस्वारांना बसत गेला. बाईकस्वारांच्या हलगर्जीपणामुळे २००२ ते २०१४पर्यंत ५२ बाईकस्वार आणि त्यांच्या सहकार्यांचे प्राण गेले.२00२ साली जे.जे. उड्डाणपूल उभारून बाईकस्वार आणि चारचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला. हा सर्वच वाहनांना फायदेशीर ठरणारा असल्याने त्याचा बाईकस्वार, चारचाकी वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. मात्र या पुलावरून जाताना बाईकस्वारांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे त्याचा फटका त्यांना आणि वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांनाही बसला. पुलावर मोठ्या प्रमाणात बाईकस्वारांचे अपघात होतानाच त्यात अनेकांचे प्राण जाऊ लागले. हे पाहता ३१ मार्च २०१० रोजी जे.जे. पूल बाईकस्वारांसाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आणि १ एप्रिल २०१०पासून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. मात्र ही बंदी झुगारूनही या पुलावरून बाईकस्वार जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २००२ ते २०१४पर्यंत या पुलावर ५२ बाईकस्वारांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा जीव गेला असून, ६५ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर १८४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुरुवातीला असणाऱ्या अपघातांचे प्रमाण पाहता ही बंदी घालण्यात आली मात्र त्यानंतरही बाईकस्वार बंदीकडे दुर्लक्ष करून रात्री आणि मध्यरात्री पुलावरून जात असल्याने त्यांनाही अपघातांना सामोरे जावे लागले. हे पाहता अपघातांचा आकडा अधिक असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)