शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालसारखा हिंसाचार देशाच्या अन्य राज्यातही भडकणार?; केंद्र सरकार अलर्ट
2
Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडे गुरुजी यांच्या पायाचा कुत्र्याने घेतला चावा, सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
3
वारी निघाली लंडनला...!! २२ देशातून १८ हजार किमी प्रवास; पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान
4
मेहुल चोक्सीला फरार घोषित करण्यास विलंब; ईडीचा अर्ज कोर्टात ७ वर्षे प्रलंबित
5
Arjun Tendulkar IPL 2025: Mumbai Indians खेळायची संधी देईना, त्याचदरम्यान अर्जुन तेंडुलकरची इन्स्टा स्टोरी चर्चेत
6
Stock Market Today: शेअर बाजार सुस्साट... १६९५ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex; मेटल, रियल्टी शेअर्समध्ये बंपर वाढ
7
‘मंदिरात ताकद असती तर देशात लुटारू आलेच नसते’, समाजवादी पार्टीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
8
डोनाल्ड ट्रम्प फोडणार आणखी एक बॉम्ब; २० एप्रिलनंतर अमेरिकेत काय घडणार? लोक चिंतेत
9
आजचे राशीभविष्य - १५ एप्रिल २०२५, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिकदृष्टया लाभदायक दिवस
10
क्रिकेट की बिझनेस… IPL ची ब्रँड व्हॅल्यू ऐकून अवाक् व्हाल, या खेळात कसा खेचला जातोय पैसा?
11
दोन नराधमांकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; चिमुरात तणाव, जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक, आरोपी अटकेत
12
लखनौमध्ये रुग्णालयाला मध्यरात्री लागली भीषण आग, प्रसंगावधान दाखवत असे वाचवले २०० रुग्णांचे प्राण   
13
26/11 Mumbai Attack: तहव्वूर राणाची एनआयएकडून रोज ८-१० तास कसून चौकशी, हल्ला होण्यापूर्वी तो कुठे-कुठे फिरला?
14
मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार 'सुपर कूल'; मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार
15
लग्नानंतर ९ वर्षांनी घटस्फोट घेणार दिव्यांका त्रिपाठी? पती विवेक दहिया म्हणाला- "मी आणि दिव्यांका..."
16
Palghar: पाणीटंचाईने प्रचंड हाल! हंडाभर पाण्यासाठी महिलांना जागावी लागते रात्र
17
महाराष्ट्रातील ५८० अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार; पगारही वसूल करणार?
18
लेख: ‘राज ठाकरेंच्या घरासमोर माझ्या मुलाने दहा कोटींचा फ्लॅट घेतलाय!’
19
तेलंगणात अनुसूचित जाती वर्गीकरण लागू; अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य
20
महू ते लंडन... भीमाचे नाव नाही असे ठिकाण नाही, जगभरातील स्मारके देतात आंबेडकरांच्या कार्याची साक्ष

मोठी बातमी! आता पांढऱ्या रेशन कार्ड धारकांवरही ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 17:09 IST

राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते.

गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. याच्या तयारीला सुरुवात झाली असून पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. 

शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी, सर्व उपनियंत्रक शिधावाटप यांना रेशन कार्डचे आधारशी जोडणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०१९ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये २०२३ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. यानुसार आरोग्य विमा योजनेचा लाभ हा  शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना देखील देण्यात येणार आहे. 

या कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी सदर शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न (Aadhar Seeded) करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत. या आरोग्य योजनेनुसार या योजनेशी संलग्न सर्व नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत. यामध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालये येतात. शहरे तसेच निमशहरी भागातील हॉस्पिटलमध्ये हे उपचार दिले जातात. 

टॅग्स :Healthआरोग्यayushman bharatआयुष्मान भारत