शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'मध्ये घुमणार महिलेचा आवाज! तृप्ती देसाई होणार सहभागी?

By admin | Updated: September 12, 2016 11:16 IST

टी.व्ही.वरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या नव्या सीझनमध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई सहभागी होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी लढा देणा-या 'भूमाता ब्रिगेड'च्या तृप्ती देसाई आता प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या ' बिग बॉस'चा १० वा सीझन पुढील महिन्यात येणार असून तृप्ती देसाईंना शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. या शोमध्ये नेमही सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होतात, मात्र यावेळी शोमध्ये सामान्य जनतेलाही सहभागी होता येणार आहे. 
 
आवाज महिलेचा ठेवा तर सहभागी होईन  - तृप्ती देसाईंची अनोखी अट
आम्ही महिलांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याची बिग बॉसनेही दखल घेतली असून त्यांनीच मल शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचारण केली. गेल्या महिन्यात आमची मीटिंगही झाली. मात्र या शोमध्ये सहभागी झाल्यास संपूर्ण ९० दिवस बिग बॉसच्या घरात रहावे लागते, बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क ठेवता येत नाही,  असे मला कळले. मात्र माझ्या आधीच काही कमिटमेंट्स असून त्या तारखा अॅडजस्ट झाल्यास मी शोमध्ये सहभागी होण्याचा विचार करेन, असे मी चॅनेलवाल्यांना सांगितले. मात्र यो शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी मी त्यांच्यासमोर अट ठेवली आहे. या शोमधील ' बिग बॉस' चा आवाज महिलेचा असावा. गेल्या ९ सीझनपासून एका पुरूषाने ही धुरा सांभाळली आहे, मात्र आता ती जबाबजारी महिलेकडे दिल्यास इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे 'महिला' हे क्षेत्रही गाजवतील असा मला विश्वास वाटतो, असे तृप्ती देसाई यांनी सांगितले.