शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘बिग बीं’चा वाढदिवस 'डॉन' स्टाईलने उत्साहात

By admin | Updated: October 12, 2015 00:54 IST

७४ वा वाढदिवस : शहरात चाहत्यांकडून फटाक्यांची आतषबाजी, केकचे वाटप

कोल्हापूर : भारतीय चित्रपटसृष्टीत ज्यांची ओळख ‘बिग बी’ आहे, असे ‘डॉन’ समजले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७४ वा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा झाला. देशातील विविध शहरांसोबत बच्चनप्रेमींनी कोल्हापुरात उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अमिताभ बच्चन यांचा रविवारी वाढदिवस होता. त्यानिमित्त कोल्हापुरातील अमिताभ बच्चनप्रेमी रिक्षाचालक शशिकांत गजगेश्वर यांनी संपूर्ण रिक्षाला (एमएच ०९-जे ८१६८) ‘बिग बी’चे रिफ्लेक्स लावले. गजगेश्वर यांनी शहरातील चौका-चौकांत केक कापून चॉकलेट्स वाटली. त्याचबरोबर दिवसभर आपल्या रिक्षामधून प्रवाशांना मोफत सेवा देत त्यांना इच्छित स्थळी पोहोचवले. तसेच रिक्षामध्ये अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांतील गीते टेपरेकॉर्डरवर लावून प्रवाशांना खुश करुन टाकले. गजगेश्वर यांची रिक्षा दिवसभर चर्चेचा विषय ठरली.दरम्यान, ‘बच्चनवेडे’ ग्रुपच्या वतीने शिवाजी चौकात अमिताभ बच्चन यांचे भव्य पोस्टर लावून, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी केक कापून बच्चन यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या ठिकाणी बच्चनप्रेमी शशिकांत गजगेश्वर यांनीही उपस्थिती लावली. त्याचबरोबर काही बच्चनप्रेमींनी शहरातील मोठ्या हॉटेलांमध्ये ‘बिग बीं’चा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवरही बच्चन यांच्या चित्रपटांतील व त्यांच्या जीवनातील काही दृश्ये शेअर होत होती. ( प्रतिनिधी )कोल्हापुरात शिवाजी चौकात रविवारी बच्चनवेडे ग्रुप यांनी केक कापून व फटाके वाजवून ‘बिग बी’ यांचा वाढदिवस दिमाखात साजरा केला. यावेळी बच्चनपे्रमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कोल्हापुरातील अमिताभ बच्चन पे्रमी असलेले शशिकांत गजगेश्वर यांनी आपली रिक्षा अशा प्रकारे सजविली होती.