शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ - जळगाव चौथ्या रेल्वे मार्गालाही मंजुरी...!

By admin | Updated: September 14, 2016 16:13 IST

यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात भुसावळ-जळगाव या २५ कि.मी.लांबीच्या चौथ्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यास मंजुरी देण्यात आली होती

ऑनलाइन लोकमत 
तिसऱ्या व चौथ्या भुसावळ-जळगाव रेल्वे मार्गाचे काम एकाचवेळी 
२६१.३७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मुख्यालयाला सादर 
 
भुसावळ, दि. 14 - यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात भुसावळ-जळगाव या २५ कि.मी.लांबीच्या चौथ्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यास मंजुरी देण्यात आली होती. या दरम्यान, यामार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता या चौथ्या मार्गाच्या उभारणीला रेल्वे मंडळाने मंजुरी दिली असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
भुसावळ-जळगाव या तिसऱ्या रेल्वे मार्गासोबतच चौथ्या रेल्वे मार्ग अंथरण्यात येणार आहे,असेही रेल्वे सूत्रांनी सांगितले.
 
२६१.६७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक
भुसावळ-जळगाव या २५ कि.मी.चा चौथा रेल्वे मार्ग उभारण्यासाठी अंदाजित २६१.३७ कोटी रुपये खर्च येणार आहे.त्याबाबतचे अंदाजपत्रक मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयाला सादर करण्यात आले असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
 
डिसेंबर २०१६ पर्यंत मंजुरी
दरम्यान,रेल्वे मंडळाने चौथ्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. डिसेंबरपर्यंत या मार्गाचे काम करण्यास मंजुरी मिळेल,असे सूत्रांचे म्हणणे आहे.
 
मार्च २०१९ उद्दिष्ट
तिसरा आणि चौथा मार्ग एकत्र उभारण्यात येणार आहे.या दोन्ही मार्गांची सोबतच उभारणी केली जाणार आहे. मार्च २०१९ पर्यंत या दोन्ही मार्गांचे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 
भू-संपादन प्रक्रिया रोडावली
या मार्गासाठी अत्यंत आवश्यक अशी चार कि.मी. इतकी जमीन भू-संपादनाची प्रक्रिया व्हायची आहे. ही जमीन तरसोद, नशिराबाद आणि असोदा या तीन गावांच्या शिवारातील आहे. जमीन संपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन संपादनाचा प्रस्ताव प्रलंबित आहे.प्रक्रिया रोडावली आहे. जमीन संपादनानंतर तिसऱ्या व चवथ्या रेल्वे मार्गाच्या कामाला एकाचवेळी गती मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.२०१३ च्या नवीन कायद्यानुसार भू-संपादन प्रक्रिया राबविली जात आहे. चवथ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असल्याने व अंदाज पत्रकासह प्रस्ताव मुख्यालयासह रेल्वे बोर्डाकडे सादर झाला आहे. त्यामुळे दोन्ही मार्गाचे काम एकाचवेळी सुरू होईल.
 
मनमाड-इंदूर सर्व्हेसाठी निविदा निघणार
मनमाड-इंदूर या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी महिनाभरात निविदा प्रक्रिया सुरू होईल. यावर्षी सर्व्हे पूर्ण होईल. पाचोरा-जामनेर ही रेल्वे बोदवडपर्यंत व पहूर-अजिंठा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
 
जळगाव-मनमाड थर्ड लाईनसाठी मंजुरी 
दरम्यान मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील अत्यंत महत्त्वाच्या अशा जळगाव-मनमाड या तिसऱ्या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या मार्गाचे सर्वेक्षणही सुरू होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.सर्वेक्षणानंतर मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
 
जळगाव-मनमाड  थर्ड रेल्वे लाईनसाठी अहवाल
चालू वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या जळगाव-मनमाड या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक यांना या महिन्यात सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
भुसावळ-जळगाव अत्यंत व्यस्त मार्ग
भुसावळ रेल्वे स्थानक महत्त्वाचे आहे.नागपूर व दिल्लीकडून प्रत्येकी दोन मार्ग भुसावळात येतात.अशाच पद्धतीने जळगाव येथून मुंबईकडे व सुरतकडे दोन मार्ग जातात.भुसावळ-जळगाव दरम्यान दोनच मार्ग आहेत.त्यामुळे हा मार्ग अत्यंत व्यवस्त असून कोणतीही नवीन रेल्वे सुरू करणे कठीण आहे.
 
२५ कोटींची बचत...
रेल्वेच्या बांधकाम विभागाने अतिशय काळजीपूर्वक तिसरा रेल्वे मार्ग उभारणीचे नियोजन केले आहे.त्यासाठी जळगाव-भुसावळ दरम्यान भादली जवळ वळण तयार करुन मातीचा भराव टाकून पूलाची उभारणी केली.त्यामुळे या खालून व वरुन रेल्वे मार्ग राहणार आहे.तसा पूलही आकारास येत आहे.या नवीन तंत्रज्ञानामुळे भारतीय रेल्वेचा २५ कोटी रुपयांचा निधी वाचला.याचे श्रेय भुसावळ रेल्वे विभागाला जात आहे.डीआरएम सुधीरकुमार गुप्ता यांचे याकामी मार्गदर्शन लाभले.