शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या अवैध मालमत्तेची चौकशी

By admin | Updated: February 18, 2015 03:00 IST

२ हजार ५२० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची खुुली चौकशी करण्याची अनुमती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितली

फाइल गृृह विभागाकडे : २ हजार कोटींचा मामलायदु जोशी- मुंबईमाजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जमा केलेल्या २ हजार ५२० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची खुुली चौकशी करण्याची अनुमती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितली असून, या संदर्भात मुख्यमंत्री एक-दोन दिवसांत निर्णय घेतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. माजी मंत्री भुजबळ, त्यांचे पुत्र आमदार पंकज आणि पुतणे समीर तसेच अन्य काही नातेवाइकांनी २ हजार ५२० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया आणि सामाजिक कार्यकर्ते संजीव खांडेकर यांनी या मालमत्तेसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी भुजबळ कुटुंबाने जमविलेल्या संपत्तीचा इत्थंभूत तपशील दिला होता. बेहिशेबी मालमत्ता किती आणि कशी जमविली, पदाचा दुरुपयोग कसा केला याची माहितीही देण्यात आली होती.यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्यमंत्र्यांकडे खुल्या चौकशीची मागणी केली असून, संबंधित फाइल गृह विभागाकडे पोहोचली आहे. आधी महाराष्ट्र सदन, आता बेहिशेबी मालमत्ताच्एसीबीने मागणी केलेल्या चौकशीला मुख्यमंत्री कुठल्याही क्षणी हिरवा कंदील देतील, असे सूत्रांनी सांगितले. च्दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी भुजबळ यांची एसीबीमार्फत चौकशी करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या डिसेंबरमध्येच मान्यता दिली असून, ती चौकशी सध्या सुरू आहे. च्आता बेहिशेबी मालमत्तेची चौकशी होणार असल्याने भुजबळ यांच्यापुढील अडचणीत वाढ होणार आहे.तक्रारीतील कंपन्यांची नावेदमानिया यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये आर्मस्ट्राँग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., भुजबळ वाइन्स, इंटेलेक्च्युअल मॅनेजमेंट कन्सल्टंट प्रा.लि., बावेश बिल्डर्स प्रा.लि., आर्मस्ट्राँग प्युअर वॉटर प्रा.लि., जय इलेक्ट्रॉनिक प्रा.लि., सुवि रबर प्रा.लि., देविशा इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रोथ इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., उन्नती रिएल्टर्स आदी २० कंपन्यांच्या नावे असलेल्या संपत्तीचे विवरण देण्यात आले आहे. पैसा ‘पांढरा’ करण्याचा कोलकाता पॅटर्नभुजबळ आणि कुटुंबीयांनी काळापैसा पांढरा करण्यासाठी ‘कोलकाता पॅटर्न’चा वापर केल्याचे दमानिया यांनी तक्रारीत म्हटले आहे. 20 पेक्षा अधिक कंपन्यांची स्थापना भुजबळ कुटुंबीयांनी केली. छुप्या वा बनावट कंपन्यांद्वारे आपल्या कंपन्यांचे समभाग खरेदी केले गेले. या कंपन्यांच्या समभागाचे दर्शनी मूल्य १०० रुपये इतके होते. पण प्रति समभाग ९,९०० रुपये या भावाने हे शेअर्स जारी केल्याचे दमानिया यांनी तक्रारीत म्हटले आहे. भुजबळ बंधुंची चौकशी होणारमहाराष्ट्र सदनप्रकरणी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर, पुत्र पंकज यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व अंमलबजाबवणी महासंचालनालय (ईडी) चौकशी करणार.