Bhendwal Bhavishyavani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 09:01 IST2025-05-01T08:55:59+5:302025-05-01T09:01:39+5:30

Bhendwal Ghatmandni Prediction 2025: पीक परिस्थिती सर्वसाधारण, भरपूर पाऊस, भेंडवळ घट मांडणीची भाकीत

Bhendval Prediction: the king will be under immense pressure due to the crisis in the country | Bhendwal Bhavishyavani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी

Bhendwal Bhavishyavani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी

जयदेव वानखडे

जळगाव जामोद (बुलढाणा) :  महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळ घटमांडणीचे भाकीत आज एक मे रोजी पहाटे सहा वाजता चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराजांनी जाहीर केले. यावेळी घटातील शत्रूचे प्रतीक असलेला मसूर हे धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळले त्यामुळे शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. परंतु करडी धान्य म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था..करडी हे धान्य साबूत असल्यामुळे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. त्यामुळे शत्रू आपल्या देशाचे काही वाकडे करू शकणार नाही. परंतु देशावर संकट असल्याने राजाला प्रचंड ताण राहील देशाच्या तिजोरीत खळखळाट असेल अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे. 

त्याशिवाय यावर्षी भरपूर पावसाळा असून जून सर्वसाधारण, जुलैमध्ये भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये साधारण पाऊस तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस बरसणार आहे. अवकाळी पावसाचे सुद्धा थैमान राहील त्याचबरोबर पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहील. आणि करव्या वरील पुरी गायब असल्याने पृथ्वीवर प्रचंड संकट येतील त्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तींचा सहभाग असू शकतो. पिकांच्या उत्पन्नाची अनिश्चितता असून भावातही तेजी मंदिर राहील कुठे कमी तर कुठे जास्त पीक येईल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी सुद्धा होईल आणि पिकांवर रोगराई पसरेल असाही अंदाज भेंडवळच्या घटमांडणीत वर्तवला आहे. 

दरम्यान, घटामध्ये मांडलेल्या १८ धान्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झालेले आढळून आले त्यावरून भविष्यवाणी जाहीर करण्यात आली. भेंडवळची भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर विदर्भातील अनेक शेतकरी रात्रीपासूनच मुक्कामी होते.

भेंडवडची मांडणी

कापूस पिक -सर्व साधारण
ज्वारी पिक:- साधारण भावात चांगले
सोयाबीन :- चांगले 
तूर पिक: - साधारण
मुंग पिक: - साधारण
उडीद पिक :- सर्वसाधारण
तील पिक :-चागले
भादली :- रोगराई जास्त
बाजरी पिक :- उत्तम
तांदूळ पिक:- साधारण/ भावात तेजी
मठ पिक सर्व- साधारण
जवस् पिक:- साधारण /नासाडी
लाख पिक:- साधारण भावत तेजी
वाटाणा पिक:- साधारण 
गहू पिक: - साधारण
हरबरा:- साधारण/भाव कमी

देश
नैसर्गिक आपत्ती संरक्षण खाते मजबूत राहील
परकीय देशाचा त्रास राहील
आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट राहील

पाऊस
जुन कमी व साधारण 
जुलै साधारण जून पेक्षा जास्त
ऑगस्ट सर्व साधारण
सप्टेंबर  जास्त व् अवकाळी पाऊस

Web Title: Bhendval Prediction: the king will be under immense pressure due to the crisis in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.