शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Bhandara Fire Live Updates : दुर्घटनेच्या चौकशीसाठी डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 21:21 IST

Bhandara Fire Live Updates : धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

ठळक मुद्देया युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

भंडारा :   भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचे समजते. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.दोषींवर कठोर कारवाई होईल, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशाराभंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील  बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली  असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज  सांगितले. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. 

अतिशय दुर्देवी घटना, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश - अनिल देशमुख अतिशय दुर्देवी घटना आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, नॅशनल फायर कॉलेज आणि व्हिएनआयटी कॉलेज मिळून या घटनेचे फायर ऑडिट करतील. राज्य शासनाने मृताच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

- भंडारा जिल्हा रुग्णालयातील प्रकरणाची चौकशी एका महिन्यात करून अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येईल - संजय राठोड, महसूल मंत्री

- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलाय, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा - फडणवीसभंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिटचा प्रस्ताव 12 मे 2020 रोजी रुग्णालय प्रशासनाने आरोग्य उपसंचालक यांच्या मार्फत संचालक यांच्याकडे पाठविला होता, परंतु त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी हा हलगर्जीपणा केला आहे, त्या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

घटना खरंच हृदयद्रावक - सुनील केदारभंडारा येथील घटना खरंच हृदयद्रावक आहे. मन खिन्न करणारी ही घटना असून त्या निष्पाप चिमुकल्यांसोबत घडावी हे विश्वास करण्यालायक नाहीच आहे. त्या निष्पाप चिमुकल्यांच्या प्रती संवेदना प्रकट करतो व त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना, असे काँग्रेस नेते सुनील केदार यांनी म्हटले आहे. 

सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे - रोहित पवारभंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागून त्यात १० नवजात बालकांच्या झालेल्या मृत्युच्या घटनेने खूप वेदना झाल्या. ज्या कुटुंबीयांवर हे दुःख कोसळले त्यांच्याप्रति माझ्या सहवेदना आहेत. या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, असा विश्वास आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

ही हत्या, महाराष्ट्र सरकार जबाबदार : राम कदमभंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये 10 निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू हा प्रशासनच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ही हत्या आहे. त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, अशी टीका भाजपा नेते राम कदम यांनी केली आहे.

नऊ बालकांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपुर्दनऊ नवजात मृत बालकांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आले. त्यांच्या गावी वाहनाने मृतदेह रवाना करण्यात आले.

 दुर्घटनेबद्दल राज्यपालांकडून दु:ख व्यक्तराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर यूनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु:ख झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

दहा बालकांना वाचवू शकलो नाही, याची खंतराहुल गुप्ता, गौरव रेहपाडे, शिवम मडामे, प्रिन्स दहिकर या चारही युवकांनी एसएनसीयू सेंटरमध्ये शिरून नवजात बालकांना बाहेर काढले. यात त्यांना सात बालकांना जिवंत सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, परंतु दहा बालकांना ते वाचवू शकले नाहीत, याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सर्व रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तात्काळ ऑडिट करा : अजित पवारया घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी - नितीन गडकरीभंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे. ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना, असे ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

मन हेलावून टाकणारी घटना - नरेंद्र मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच जे बालक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना मी व्यक्त करतो, असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे. 

घटनेची सखोल चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांकडून भंडारा पोलिसांना आदेश भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून  १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी भंडारा पोलिसांना दिले आहेत. आज दुपारी गृहमंत्री अनिल देशमुख घटनास्थळी भेट देणार आहे.

घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी - देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

घटना अत्यंत वेदनादायी - राहुल गांधीभंडाऱ्यातील या घटनेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की, या घटनेतील मृत आणि जखमी बालकांच्या कुटुंबीयाना हरतऱ्हेची मदत करावी, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत - राजेश टोपेया घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशी करण्याचे निर्देशमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगfireआगUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajesh Topeराजेश टोपेRahul Gandhiराहुल गांधीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुखAjit Pawarअजित पवारRohit Pawarरोहित पवारRam Kadamराम कदम