शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : १८ ते ४४ वयोगटातील सधन वर्गानं लस विकत घ्यावी असं स्पष्ट मत - आरोग्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 13:46 IST

Corona Vaccination : १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचंच होणार लसीकरण.

ठळक मुद्दे१ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचंच होणार लसीकरण.सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे.

देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाप्रतिबंधात्मक लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचं काम सध्या सुरू आहे. दरम्यान, १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. तसंच लस उत्पादक कंपन्यांना एकूण उत्पादनाच्या ५० टक्के लसी खुल्या बाजारातही विकता येणार आहेत. त्यामुळे राज्यांना आणि खासगी रुग्णालयांनाही या लसी खरेदी करण्याची मुभा असेल. या पार्श्वभूमीवर १८ ते ४४ या वयोगटातील सधन वर्गानं लस विकत घ्यावी असं स्पष्ट मत असल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.गरीब आणि अतिगरीब घटकांना मदत करण्यात येत असेल तर त्याचा विचार शासन स्तरावर केला जाईल. त्याबाबत नक्कीच निर्णय घेऊ. पण ज्यांना लस विकत घेणं विकत घेणं शक्य आहे, जो श्रीमंत वर्ग आहे त्यांनी ती लस विकतच घेतली पाहिजे असं स्पष्ट मत आहे, असंही ते म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. "आपल्याकडे स्पुटनिक, मॉडर्ना अशा काही परदेशी लसींनाच्या वापरासही मंजुरी देण्यात आली आहे. परंतु या लसी अत्यंत महागड्या आहेत. आपल्यापेक्षा त्या लसींची किंमत ७ पट, ८ पट, १० पट जास्त आहे. आपल्याला लसी मोठ्या प्रमाणात खरेदी करायच्या आहेत. त्यामुळे त्यांच्याची चर्चा करण्यात येणार असून त्यांनी किंमती कमी करण्याचं मान्य केल्यास त्यांच्याकडूनही लस खरेदीचाही विचार केला जाईल, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलं आहे," असं त्यांनी नमूद केलं. सीरमच्या लसी २४ मेपर्यंत बुक"सीरमच्या लसींचे डोस २४ मे पर्यंत केंद्र सरकारकडे बुक आहेत अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे. त्यामुळे आपल्याला संपूर्ण महिना लस खरेदी करता येणार नाही. भारत बायोटेक ही सरकारी कंपनी आहे. त्यांच्याशी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी चर्चा करत आहेत. त्यांनी अद्याप राज्य सरकारांना या लसी किती रुपयांत द्यायच्या याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय एक दोन दिवसात झाल्यास त्यांना ऑर्डर देता येऊ शकतील," असंही टोपे म्हणाले. किती रुपयांत लस द्यायची कोणत्या घटकांना लस मोफत द्यायची हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेता येईल. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्र