शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘तीन पत्ती’वरही होतेय बेटिंग!

By admin | Updated: March 22, 2015 01:02 IST

भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात बेटिंग झाल्याची चर्चा सुरू आहे़ असे असतानाच स्मार्टफोनवर तीन पत्ती या गेममध्ये नवे सॉफ्टवेअर अपडेट झाले असून, त्यातून सामन्यावर बेटिंग लावली जात आहे.

अमरावती : क्रिकेटचा महासंग्राम असलेल्या वर्ल्डकपला मोठ्या दिमाखात सुरुवात झाल्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात बेटिंग झाल्याची चर्चा सुरू आहे़ असे असतानाच स्मार्टफोनवर तीन पत्ती या गेममध्ये नवे सॉफ्टवेअर अपडेट झाले असून, त्यातून सामन्यावर बेटिंग लावली जात आहे. याची किंमत आणि तीव्रता कमी असली तरी लहान मुलांच्या हातातील या स्मार्टफोनमुळे भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी त्याद्वारे बेटिंग सुरू केल्याने त्यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते आहे. मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते़आॅटोमॅटिक 'अपडेट' : स्मार्ट फोनमध्ये ज्यांच्याकडे तीन पत्ती हा गेम आहे, त्यांच्या मोबाइलमध्ये वर्ल्डकपसाठीचे बेटिंग सॉफ्टवेअर आॅटोमॅटिक डाऊनलोड होते. हे अ‍ॅप्लिकेशन स्मार्ट फोनवर डाऊनलोड होत असून, कुणालाही फोनाफोनी न करता इथे बेटिंगचा भाव कळतो आणि सट्टाही लावला जातो. बेटिंगचा पारंपरिक डाव मोडून अनेकांनी ही आॅनलाइन बेटिंग सुरू केली आहे. लहान मुलेही त्यात मागे नाहीत. आॅनलाइन बेटिंगच्आॅनलाइन क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून सट्टेबाजाराला मध्यस्थ न ठेवता यात बेटिंग लावता येते. भारतातल्या कुठल्याही बँकेद्वारे त्यावरील देवाण-घेवाण हे कार्ड नियंत्रित करते. मोबाइलमध्ये जेवढे चीप्स शिल्लक असतील तेवढा सट्टा लावता येतो आणि जिंकलेले चीप्स दुसऱ्याला विकण्यासाठीही वेगवेगळ्या युक्ती या सट्टेबाजांकडून लढविली जात आहेत. जुगारात मुलांचेही वाढले प्रमाणच्लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन आल्यामुळे आता त्यांनाही सट्टा लावायची सवय लागत आहे. आधी सट्टा हा फक्त मोठ्या लोकांचाच खेळ समजला जायचा; परंतु आता कालौघात छोट्या रकमेचेही सट्टे लावले जाऊ लागल्याने त्याची व्याप्ती वाढत आहे. त्यातच स्मार्टफोनने तर लहान मुलांनाही यात ओढले असून, भविष्यात सट्ट्याचे प्रमाण यामुळे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या गेम्सवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान पोलीस दलासमोर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये नेटवर्क 'नो प्रॉब्लेम'च्भारतात बेटिंग हा गुन्हा असला, तरी पाश्चिमात्य देशांमध्ये त्याला अधिकृत परवानगी आहे. बेटिंगचे दर पूर्वीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरूनच येतात. बाहेरील सट्टाबाजारासारखे येथे सट्ट्याचे दर जाणून घेण्यासाठी कुठेही फोनाफोनी करावी लागत नाही. तसेच एखादी विकेट गेली किंवा चौकार, षटकार ठोकला गेला, तर बेटिंगच्या दरामध्ये होणारे चढ-उतार येथे नसतात. यात केवळ सामना कोण जिंकणार यावरच सट्टा लावला जातो. नेटवर्कचा प्रॉब्लेम या सॉफ्टवेअरमध्ये येत नाही. केवळ चलन असेल, तर पाहिजे तेवढे सट्टे यात लावले जातात.