शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

‘वेस्ट’ फूडपासून ‘बेस्ट’ गॅसनिर्मिती

By admin | Updated: November 3, 2014 03:29 IST

सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि तुटवड्यावर उपाय म्हणून एका पर्यावरणप्रेमीने अत्याधुनिक मोल्डिंग बायोगॅस प्रकल्प तयार केला आहे.

सचिन राऊत, अकोलासिलिंडरच्या वाढत्या किमती आणि तुटवड्यावर उपाय म्हणून एका पर्यावरणप्रेमीने अत्याधुनिक मोल्डिंग बायोगॅस प्रकल्प तयार केला आहे. अवघ्या चार फूट जागेत लागणारा हा प्रकल्प सुरक्षित असून, अवघ्या ५०० ते ६०० ग्रॅम शिळ्या अन्नातून पाच जणांचा स्वयंपाक होईल, एवढी बायोगॅसनिर्मिती होऊ शकते. या प्रकल्पामुळे एका कुटुंबाची वर्षाकाठी पाच ते सहा सिलिंडरची बचत करणे शक्य असून, अन्न फेकून देण्याच्या समस्येलाही आळा बसणार आहे. विशेष म्हणजे वेस्ट फूडपासून बेस्ट गॅसची निर्मिती करणारे असे सुमारे १२५ प्रकल्प विदर्भ व मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत.पर्यावरणप्रेमी अशोक तोष्णीवाल व गिरीश राठी यांनी मोल्डिंग बायोगॅस प्रकल्प तयार केले. पर्यावरण रक्षणासोबतच गृहिणींचे बजेटही यामुळे सांभाळले जात असल्याने दोन वर्षांत त्यांनी राज्यभरात १०० ते १२५ प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. दोन वर्षांपूर्वी लावलेले हे प्रकल्प आजही विनाखर्चाने सुरू असल्याने त्याची मागणी वाढल्याचे तोष्णीवाल सांगतात़ ५०० ते २००० लीटरच्या टाक्यांमध्ये हा प्रकल्प उपलब्ध असून, १००० लीटरच्या बायोगॅस प्रकल्पासाठी दररोज केवळ दीड किलो बायोवेस्ट किंवा तीन किलो शेणखत लागते. यातून तयार होणाऱ्या गॅसवर दिवसाला पाच लोकांच्या कुटुंबाचा स्वयंपाक तयार होतो. एक किंवा दोन महिने त्याचा वापर नसला तरी पुन्हा सुरुवात करताना कोणतीही अडचण येत नाही. एवढेच काय, कॉक उघडा करून आगपेटी लावली तरीही गॅसचा भडका होत नसल्याने गृहिणींसाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. छतावर किंवा जमिनीवर हा प्रकल्प लावता येतो.