शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलीस मुख्यालयात बर्म्युडा घालून येण्यास बंदी

By admin | Updated: August 14, 2014 03:37 IST

देशातील कोणत्याही पोलीस शाखेत आजवर काढला गेला नसेल असा अजब फतवा मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने दिला आहे.

डिप्पी वांकाणी, मुंबईदेशातील कोणत्याही पोलीस शाखेत आजवर काढला गेला नसेल असा अजब फतवा मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने दिला आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयात अभ्यागतांना बर्म्युडा घालून येण्यास मज्जाव केला गेला आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारांवर तशी रीतसर नोटीस लावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे अतिरिक्त आयुक्त कैसर खालीद यांनी याविषयी ‘लोकमत’ला सांगितले, एकदा अमेरिकेतील एक अनिवासी भारतीय टीशर्ट आणि बर्म्युडा परिधान करून कार्यालयात आला. एका व्यक्तीचा संदर्भ देऊन तो आला होता. मी त्याला तो अमेरिकेत काय काम करतो असे विचारल्यावर त्याने तो सॉप्टवेअर इंजिनीअर असल्याचे सांगितले. मी त्याला विचारले की तू तुझ्या आॅफिसमध्येही अशाच वेशात जातोस का, त्यावर त्याने म्हटले की मी असा कसा काय एखाद्या आॅफिसात जाऊ शकतो. त्यावर मी त्याला म्हणालो की, पोलीस गंभीर काम करतात आणि त्यांच्या कार्यालयात जाताना काही शिष्टाचार पाळणे गरजेचे आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?तो अमेरिकन जोपर्यंत पूर्ण लांबीची पँट घालून व्यवस्थित पोषाख करून आला नाही तोवर मी त्याचे काम केले नाही, अशी पुस्तीही खालीद यांनी जोडली. खालीद यांनी असाच आणखी एक किस्सा सांगितला. अभिनेता अली फैसल देखील एकदा त्याच्या पासपोर्टसंबंधी काही काम घेऊन बर्म्युडा घालून आमच्या कार्यालयात आला. आमच्या कॉन्स्टेबलनी त्याला व्यवस्थित पोषाख करून येण्यास सांगितले आणि त्यानंतरच त्याचे काम केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते एखादी व्यक्ती अशा अवतारात कार्यालयात आल्यास कार्यालयाची एकंदर शिस्त आणि कामाचा मूड बिघडतो. त्यामुळेच यापूर्वीही पोलीस कर्मचाऱ्यांसाठीही असे शिस्तपालन करण्याविषयी सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.