शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

नेट-सेट मुक्त प्राध्यापकांना ‘कॅस’चा लाभ द्यावा

By admin | Updated: February 26, 2015 00:47 IST

उच्च न्यायालयाचा आदेश; ‘सुटा’ची माहिती

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील नेट-सेट मुक्त प्राध्यापकांना आश्वासित प्रगती योजनेचा (कॅस) लाभ द्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे (सुटा) सहकार्यवाह प्रा. डॉ. आर. जी. कोरबू यांनी पत्रकाद्वारे दिली.पत्रकात असे म्हटले आहे की, ‘सुटा’तर्फे आॅक्टोबर १९९२ ते ३ एप्रिल २००० या कालावधीमध्ये नियुक्त झालेल्या प्राध्यापकांना ‘कॅस’चे लाभ मिळावेत यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेमध्ये कोल्हापूरमधील १२६, सांगलीमधील १४२ आणि साताऱ्यातील ११७ प्राध्यापक याचिकाकर्ते होते. याचिकेबाबत मंगळवारी (दि. २४) उच्च न्यायालयाने संबंधित प्राध्यापकांना ‘कॅस’चे सर्व लाभ देण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे विद्यापीठ क्षेत्रातील नेट-सेट मुक्त प्राध्यापकांना त्यांची सेवा नियुक्तीच्या दिनांकापासून धरून त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. राज्य शासन आणि शिक्षण सहसंचालक हे नेट-सेट मुक्त प्राध्यापकांना ‘कॅस’चा लाभ देण्याबाबत टाळाटाळ करीत होते. त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठ व शिक्षण सहसंचालक कार्यालयाने तातडीने करावी, अशी ‘सुटा’ची मागणी आहे. (प्रतिनिधी)नेट-सेट मुक्त प्राध्यापकांना त्यांची सेवा नियुक्तीच्या दिनांकापासून धरून पदोन्नतीचा लाभ मिळणार