आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:58 IST2025-11-25T18:57:33+5:302025-11-25T18:58:15+5:30
कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय्य सहायक अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे हिने आत्महत्या नाही तर तिची ...

आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप
कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय्य सहायक अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे हिने आत्महत्या नाही तर तिची हत्या करण्यात आलाचा दावा गौरीच्या आई-वडिलांनी केला आहे. तिचा मृतदेह पाहिल्यानंतर त्या मृतदेहावर छातीला डोक्याला मार होता. आत्महत्या केल्यानंतर गळ्याला वळ असू शकतात, मात्र डोक्याला आणि छातीला वळ आले कुठून? असा सवाल अलकनंदा पालवे यांनी केला आहे.
मला संध्याकाळी सात वाजता फोन आला होता. म्हणे गौरी गेली, तिने फाशी घेतली. शितल गर्जे, अनंत गर्जे यांनी तिची हत्या केली आहे. हत्या करून हे पळून गेले, तिथे थांबले नाहीत. त्या तिघांनी माझ्या मुलीची हत्या केली, त्यांची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. फक्त अनंतलाच अटक का केली? बाकीच्या दोघांनाही अटक करा, अशी मागणी पालवे यांनी केली आहे.
तसेच एसआयटी मार्फत या घटनेचा तपास व्हायला हवा. बाकीच्या कोणत्याच तपासावर माझा विश्वास नाही. अनंतचा एकच मोबाईल जप्त केला आहे. कोण काय करतंय? हे काहीच कळत नाही. यांना फाशीची शिक्षा व्हायला हवी. मी माझ्या मुलीला एवढे शिक्षण दिले, ती कशातच कमी नव्हती. अनंत तिला खूप मारतो अशी तक्रार तिने केली होती. तो मला इतरवेळी कधीच कॉल करत नव्हता, भांडण झाल्यानंतरच मला कॉल करत होता. आम्ही गेलो तेव्हा आमची मुलगी पोस्टमार्टम रूम मध्ये होती. पंचनामा न करता डायरेक्ट तिला पोस्टमार्टम रूममध्ये नेले गेले, असा गंभीर आरोप गौरीच्या आईने केला आहे.
आम्ही काय मूर्ख आहोत का? लग्न झालेल्या मुलाला मुलगी द्यायला असा सवाल करत लग्नानंतर एक दोन महिनेच तो ठीक राहिला नंतर तिला मारणे आणि त्रास देणे सुरूच होते, असा आरोप त्यांनी केला आहे. मी एकदा विचारलेले की तुला काय लागलेय तर ती म्हणालेली फॅन लागला आहे. परंतू, नंतर तिनेच नवऱ्याने मारल्याचे सांगितले होते. त्याची कंप्लेंट केलेली त्याला आवडत नाही, असे ती म्हणालेली त्यामुळे मी कोणाला हे सांगितले नव्हते. आज तीन दिवस होऊन देखील दोन आरोपी फरार आहेत. हा कोणता तपास सुरू आहे? असा सवाल त्यांनी केला.