शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मिहानसाठी स्कीलफुल व्हा

By admin | Updated: February 2, 2015 01:09 IST

मिहानला आता गती प्राप्त झाली आहे पण ही गती प्राप्त होण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात आतापर्यंत वेळ गेला. मिहानची प्रत्यक्ष प्रगती दिसत नसल्याने अकारण नकारात्मकता

मान्यवरांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास : रोजगाराच्या भविष्यात अधिक संधी नागपूर : मिहानला आता गती प्राप्त झाली आहे पण ही गती प्राप्त होण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात आतापर्यंत वेळ गेला. मिहानची प्रत्यक्ष प्रगती दिसत नसल्याने अकारण नकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण आता मिहानमध्ये सध्या ८ हजार लोक नोकरी करीत आहेत. अनेक कंपन्यांचे काम गतीने सुरू आहे. येणाऱ्या काळात मिहानमध्ये नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. ही संधी कॅश करण्यासाठी तयार रहा. केवळ पदवीने ही संधी मिळणार नाही त्यासाठी आवश्यक कौशल्याचीही गरज भासणार आहे. टीसीएस, इन्फोटेक, बोर्इंग सारख्या कंपन्या या वर्षात लवकरच काम सुरू करीत आहेत. येथे केवळ नोकरी शोधण्यापेक्षा युवकांनी स्वत:चा उद्योग उभा करण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे कारण मिहानमध्ये अनेक संधी आहेत. आता खऱ्या अर्थाने मिहानचे काम सुरू झाले आहे त्यामुळे प्रत्येकालाच रोजगार मिळणार आहे. प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे येथे नोकऱ्यांची फार मोठी उपलब्धता भविष्यात आहे. उद्योगांना लागणारे साऱ्याच पंचतारांकित सोयी आणि वीज, पाणी मुबलक प्रमाणात येथे उपलब्ध असल्याने देशभरातील कंपन्यांचा ओघ मिहानकडे वळला आहे. अशी संधी विदर्भासाठी न भूतो न भविष्यती असून पदवीसह कौशल्य मिळवा आणि नोकरी मिळवा, उद्योग उभारा, असा मंत्र आज तज्ज्ञ मान्यवरांनी युवक-युवतींना दिला. ंनोकरी घेणारे नाही देणारे व्हा. त्यासाठी उद्योग उभारा. स्वत:ची क्षमता ओळखा. लोक हसतील, वेड्यात काढतील तेव्हा समजा तुमचा मार्ग योग्य आहे, असे मत डॉ. पी. बी. काळे यांनी व्यक्त केले. ंपदवी ही पात्रता झाली पण स्कील ही गरज आहे. मेक इन इंडिया करायचे असेल तर छोटे का होईना उद्योगच उभारा. उद्योगासाठी पैसा नव्हे जिद्द आणि परिश्रमाची गरज आहे. कौशल्य प्राप्त करा आणि स्वत:साठी त्याचा उपयोग करुन उद्योजक व्हा, असा मंत्र कुणाल पडोळे यांनी दिला. ंमिहानमध्ये नोकरी शोधणारे लोक नोकरीच करीत राहतील. पण काही युवकांनी तरी येथे उद्योग उभारण्याचा प्रयत्न करा. मोठे स्वप्न पाहणारे लोकच मोठे होऊ शकतात. मिहानमध्ये उद्योग उभारण्यासाठी खूप संधी आणि सवलती मिळत आहे. याचा लाभ उद्योजक म्हणून आपण का घेऊ नये, असे मत आ. आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.ंमिहानमध्ये एमएडीसीने सर्व सोयी आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आहे. उद्योगांना लागणाऱ्या सोयी उपलब्ध असल्याने येत्या काळात अनेक कंपन्यांचे लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. त्यासाठी तयार राहा,असे दीपक जोशी म्हणाले. ंमिहानमध्ये प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे संधी. त्यासाठी आपण तयार राहायला हवे. निर्यातीकडे लक्ष द्या आणि विदर्भाचा विकास करा, असे मत देवेंद्र पारेख यांनी व्यक्त केले.