शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

‘चिल्लर’ संकटामुळे ‘पीएमपी’ प्रशासनही बुचकळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 8:14 PM

दैनंदिन तिकीट विक्रीतून जमा होणारी सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर स्वीकारण्यास बँकेने नकार दिला आहे.

ठळक मुद्देदोन लाखांची चिल्लर स्वीकारण्यास बॅँकेचा नकारपीएमपीचे एकूण १३ आगार असून त्यामार्फत बसचे दैनंदिन संचलन जमा झालेल्या सुमारे १२ ते १५ लाख रुपयांच्या चिल्लरचा संबंधित आगारांमध्येच ढीगचिल्लर बँकेत जमा होत नसल्याने दैनंदिन खर्चावरही मर्यादा

पुणे : दैनंदिन तिकीट विक्रीतून जमा होणारी सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर स्वीकारण्यास बँकेने नकार दिला आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनासमोर या ‘चिल्लर’चे करायचे काय? असा वेगळाच पेच निर्माण झाला आहे. या ‘चिल्लर’ संकटामुळे प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे.पीएमपीचे एकूण १३ आगार असून त्यामार्फत बसचे दैनंदिन संचलन चालविले जाते. या आगारांमधील बस संचलनातून दररोज जमा होणारी रक्कम सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या कॅम्प शाखेतील महामंडळाच्या खात्यात जमा केली जाते. तिकीट विक्रीतून दररोज दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर जमा होते. पण बँकेने ४ आॅक्टोबरपासून ही चिल्लर स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आगारांमध्ये चिल्लर साठवून ठेवावी लागत आहे. प्रशासनाकडून याबाबत बँकेशी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यानंतरही बँकेने रिझर्व्ह बँकेचा हवाला देत ही रक्कम घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रशासनाला मागील आठ दिवसांपासूनची जमा झालेल्या सुमारे १२ ते १५ लाख रुपयांच्या चिल्लरचा संबंधित आगारांमध्येच ढीग लावावा लागत आहे.बँकेच्या भुमिकेमुळे प्रशासनासमोर चिल्लरचे नवे संकट उभे राहिले आहे. दिवसागणिक चिल्लरचा साठा वाढत जाणार आहे. लाखो रुपयांची चिल्लर बँकेत जमा होत नसल्याने दैनंदिन खर्चावरही मर्यादा येऊ लागल्या आहेत. तसेच रोजच्या हिशेब नोंदीच्या कामकाजावरही परिणाम होऊ लागला आहे. आधीच पीएमपीची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यातच हे चिल्लर संकट उदभवल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कामकाजातील सुसुत्रता कायम राखणे अडचणीचे झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.....एसटी तसेच पीएमपीमध्ये दररोज लाखो रुपयांची चिल्लर जमा होते. त्यामुळे बँकेने पैसे स्वीकारायला हवेत. पण चिल्लर न स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँकेचे निर्देश असल्याचे सेंट्रल बँकेचे म्हणणे आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी बँकेशी सातत्याने चर्चा करूनही त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे आगारांमध्ये चिल्लर साठून राहत आहे. हे आता अडचणीचे ठरू लागले आहे. त्यामुळे आता मी स्वत: बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करेन. रिझर्व्ह बँकेचे नेमक्या सुचना काय आहेत, हे पाहिले जाईल.  - नयना गुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेbankबँक