Join us  

पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 

मागील दोन महिन्यांपासून क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग २०२४चं आणखी एक यशस्वी पर्व आज संपणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 4:12 PM

Open in App

IPL 2024 KKR vs SRH Final : मागील दोन महिन्यांपासून क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग २०२४चं आणखी एक यशस्वी पर्व आज संपणार आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चेन्नईत अंतिम सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यर व पॅट कमिन्स या दोन्ही कर्णधारांचं फोटोशूट झालं आणि यामध्ये दोघांमध्ये मजेशीर संवाद पाहायला मिळाला. 

KKR चौथ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे आणि त्यांनी २०१२ व २०१४ मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे SRH तिसरी फायनल खेळणार आहे आणि २०१६ मध्ये त्यांनी बाजी मारली होती. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केले होते. कोलकाता नाईट रायडर्सने क्वालिफायर १ मध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला. SRH ने क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला.  

या सामन्यापूर्वी दोन्ही कर्णधाराचं फोटोशूट अन् व्हिडीओ काढण्यात आला. ज्यामध्ये दोन्ही कर्णधारांमध्ये मजेशीर संवाद पाहायला मिळतोय आणि एकमेकांची फिरकी घेताना दिसत आहेत. या व्हिडीओत श्रेयस ऑटो रिक्षा चालवताना दिसतोय आणि कमिन्स प्रवासी झालेला दिसतोय. यामध्ये श्रेयसने त्याच्याकडून रिक्षा भाडं म्हणून २० कोटी मागितल्याचे दिसतेय.  

आयपीएल विजेत्या संघाला बक्षीस म्हणून २० कोटी रूपये दिले जातात.  उपविजेत्या संघाला १३ कोटी रूपयांचे बक्षीस दिले जाईल. तिसऱ्या स्थानावरील संघाला ७ कोटी आणि चौथ्या स्थानावर असलेला संघ ६.५ कोटी रूपये जिंकेल. ऑरेंज कॅप विजेत्या खेळाडूला १५ लाख रूपये मिळतील. विराट कोहली या शर्यतीत आघाडीवर आहे. स्पर्धेतील इमर्जिंग प्लेअरला २० लाख आणि मोस्ट व्हॅल्युएबल ठरणाऱ्या शिलेदाराला १२ लाख रूपयांचे बक्षीस दिले जाईल. 

टॅग्स :आयपीएल २०२४कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबादश्रेयस अय्यर