लाचखोर शिधावाटप कर्मचारी निलंबित

By Admin | Updated: May 29, 2014 03:18 IST2014-05-29T03:18:16+5:302014-05-29T03:18:16+5:30

लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक झालेल्या गोवंडीच्या शिधावाटप कार्यालयातील (४४-ई) सहा अधिकारी, कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे

Bargaining rack ridden employees | लाचखोर शिधावाटप कर्मचारी निलंबित

लाचखोर शिधावाटप कर्मचारी निलंबित

मुंबई : लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक झालेल्या गोवंडीच्या शिधावाटप कार्यालयातील (४४-ई) सहा अधिकारी, कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या कार्यालयाची जबाबदारी असलेल्या उपनियंत्रक मल्लिकार्जुन माने यांना कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी लोकमतला दिली. निलंबित झालेल्या अधिकार्‍यांमध्ये शिधावाटप अधिकारी श्यामू मेलम्मा धोत्रे, सहायक शिधावाटप अधिकारी अनिरुद्ध कुलकर्णी, शिधावाटप निरीक्षक सुजाता सावंत, लिपीक प्रदीप पाटील, लक्ष्मी ढगे, शिपाई प्रशांत पांडुरंग पेजे यांचा समावेश आहे. या सर्वांना काल एसीबीने सापळा लावून एकूण अडीच हजारांची लाच स्वीकारताना अटक केली होती. या सर्वांसोबत आशा सोनावणे या महिलेलाही एसीबीने गजाआड केले होते. कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात एसीबीने नोंदवलेला एफआयआर मागवण्यात आला आहे. त्याचा अभ्यास करून या अधिकारी-कर्मचारीवर्गावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)

Web Title: Bargaining rack ridden employees